Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Pakistan FIA Masood Azhar 70 Lakh Bounty: आगामी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी आणि जागतिक दबाव कमी करण्यासाठी नवीन चाल खेळली.
Pakistan FIA Masood Azhar 70 Lakh Bounty
Terrorist Masood AzharDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pakistan FIA Masood Azhar 70 Lakh Bounty: आगामी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी आणि जागतिक दबाव कमी करण्यासाठी नवीन चाल खेळली. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने जारी केलेल्या सुधारित 'मोस्ट वॉन्टेड' लिस्टमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला जागतिक दहशतवादी मसूद अजहर (Masood Azhar) याच्यावर तब्बल 70 लाखांचा इनाम जाहीर केला. यापूर्वी 2021 मध्ये त्याच्यावर 50 लाखांचा इनाम होता, ज्यामध्ये आता 20 लाखांची वाढ करण्यात आली.

पाकिस्तानचा असा दावा आहे की, मसूद अजहर देशातून गायब असून तो अफगाणिस्तानमध्ये लपला आहे. मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तांत्रिक देखरेख आणि विश्लेषणातून पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले. भारतीय यंत्रणांच्या माहितीनुसार, मसूद अजहर गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवाबशाह भागात सुरक्षितपणे लपून बसला आहे. त्यामुळे तो पाकिस्तानातच असताना त्याच्यावर केवळ इनामाचा दिखावा करुन एफआयए जागतिक डोळ्यात धूळफेक करत असल्याचे उघड झाले.

Pakistan FIA Masood Azhar 70 Lakh Bounty
Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

एफआयएच्या या नव्या लिस्टमध्ये केवळ मसूद अजहरच नाही, तर मुंबईतील 26/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित 19 दहशतवाद्यांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये हल्ल्यासाठी आर्थिक मदत करणारे, अतिरेक्यांना सागरी मार्गाने अल-हुसैनी आणि अल-फौज या बोटींमधून मुंबईत पोहोचवणारे आणि लॉजिस्टिक मदत पुरवणाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या नव्या यादीत पाकिस्तानने चालबाजी करत 26/11च्या मुख्य संशयितांच्या छायाचित्रांसह लष्कर-ए-तयबाशी असलेला त्यांचा संबंध आणि गुन्ह्यांचे तपशील लपवले आहेत.

Pakistan FIA Masood Azhar 70 Lakh Bounty
Pakistan Honor Killing: पाकिस्तानात कुप्रथेचा भयानक नंगानाच! 'कारो-कारी'च्या नावाखाली 470 महिलांची हत्या; 12 कोटी महिलांच्या अस्तित्वावर टांगती तलवार

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या मते, पाकिस्तानची ही कोणतीही ठोस कारवाई नसून केवळ आगामी एफएटीएफच्या कारवाईतून वाचण्यासाठी केलेली नौटंकी आहे. एका बाजूला एफआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये दहशतवाद्यांची संख्या 1330 वरुन 1804 वर पोहोचली आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मसूद अजहरसारख्या नराधमांना आपल्याच भूमीवर सुरक्षित आश्रय देत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 2019 मध्येच मसूद अजहरला वैश्विक दहशतवादी घोषित केले, तरीही पाकिस्तान त्याला पाठशी घालत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com