Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, स्फोटकांनी भरलेली गाडी सुरक्षा दलाच्या चौकीवर आदळली; 5 जवानांसह 8 जणांचा मृत्यू

Mastung Security Checkpost Attack: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग जिल्ह्यातील सुरक्षा चौकीला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
Mastung Security Checkpost Attack
Mastung Security Checkpost AttackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग जिल्ह्यातील सुरक्षा चौकीला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलातील पाच जवानांचा समावेश आहे. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करून हल्लेखोरांनी सुरक्षा चौकीला लक्ष्य केल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली.

स्फोटकांनी भरलेले वाहन चौकीच्या भिंतीवर धडकवले

मिळालेल्या माहितीनुसार, मस्तुंग जिल्ह्यातील कंदवाह सुरक्षा चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली गाडी थेट सुरक्षा चौकीच्या बाहेरील संरक्षक भिंतीवर धडकवली. वाहनाच्या धडकेनंतर झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे परिसर हादरला. या स्फोटात सुरक्षा चौकीचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.

Mastung Security Checkpost Attack
Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार चकमक

स्फोटानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देत हल्लेखोरांचा सामना केला. यावेळी सुरक्षा जवान आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीतही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणांकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत.

Mastung Security Checkpost Attack
Goa Smart Meter: '15 दिवसांत स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या', अमित पाटकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

बलुचिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील संवेदनशील भाग मानला जातो. या प्रांतात यापूर्वीही सुरक्षा दल आणि सरकारी आस्थापनांना लक्ष्य करून अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. मस्तुंगमधील ताज्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हल्ल्यामागे नेमके कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत अधिकृत तपासातून माहिती समोर येणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.