Pakistan Ukraine Arms Deal: पाकिस्तानचा दोघांना चुना! एकीकडे युक्रेनला 3000 कोटींची शस्त्रे विकली, दुसरीकडे रशियाकडून स्वस्तात तेलही घेतले

Pakistan Ukraine Arms Deal: इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, पाकिस्तानने ‘कठोर तटस्थते’चे धोरण स्वीकारले आहे.
Pakistan Ukraine 3000 Crore Arms Deal|Russia
Pakistan Ukraine 3000 Crore Arms Deal|RussiaDainik Gomantak
Published on
Updated on

On one hand, Pakistan sold weapons worth 3000 crores to Ukraine, on the other hand, Pakistan also bought cheap oil from Russia:

अर्थिक संकटांनी त्रस्त असलेला पाकिस्तान रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक शस्त्रे विकत आहे. पाकिस्तानने युक्रेनला सुमारे 3,000 कोटी रुपयांची शस्त्रे विकल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आणि गहू घेत राहिले आणि उपकाराच्या बदल्यात शत्रूला शस्त्रे विकली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनला दारूगोळा पुरवण्यासाठी पाकिस्तानने गेल्या वर्षी दोन खासगी अमेरिकन कंपन्यांसोबत शस्त्रास्त्रांचा करार केला होता.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, ब्रिटीश लष्करी मालवाहू विमानाने युद्धग्रस्त देशाला शस्त्रे पुरवण्यासाठी रावळपिंडी येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळ नूर खान येथून सायप्रस, अक्रोटिरी आणि रोमानियापर्यंत पाच वेळा उड्डाण केले.

Pakistan Ukraine 3000 Crore Arms Deal|Russia
Israel-Hamas War: हमासविरुद्धच्या युद्धामुळे इस्रायलचं आर्थिक गणित बिघडलं, देश अब्जावधी डॉलर्सचा 'कर्जबाजारी'

यूएस फेडरल प्रोक्योरमेंट डेटा सिस्टमच्या कराराचा दाखला देत अहवालात म्हटले आहे की, 17 ऑक्टोबर 2022 रोजी पाकिस्तानने 155 मिमी शेल्सच्या खरेदीसाठी अमेरिकन कंपनी ग्लोबल मिलिटरीसोबत 1,926 कोटी रुपये आणि नॉर्थ्रोप ग्रूममन सोबत 1,088 कोटी रुपयांचा करार केला होता जो गेल्या महिन्यात संपला.

रिपोर्टनुसार, हे करार पीएम शाहबाज शरीफ यांच्या सरकारच्या काळात झाले होते. या आघाडीने गतवर्षी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारची हकालपट्टी केली होती.

इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, पाकिस्तानने ‘कठोर तटस्थते’चे धोरण स्वीकारले आहे.

Pakistan Ukraine 3000 Crore Arms Deal|Russia
ASEAN Meeting: आसियान देशांच्या बैठकीला राजनाथ सिंह लावणार हजेरी; भारताने सुरु केले मोठ्या रणनितीवर काम

2022-23 या आर्थिक वर्षात देशाच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत 3,000 टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीवरून अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तानने 2021-22 मध्ये 107 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली, तर 2022-23 मध्ये ती वाढून 3,447 कोटी रुपयांची झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com