ASEAN Meeting: आसियान देशांच्या बैठकीला राजनाथ सिंह लावणार हजेरी; भारताने सुरु केले मोठ्या रणनितीवर काम

India Preparing War Methods ASEAN Meeting: दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अजूनही सुरु आहे. आज वर्षभराहून अधिक काळ लोटला पण दोन्ही देश मागे सरायला तयार नाहीत.
Rajnath Singh
Rajnath Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

India Preparing War Methods ASEAN Meeting: जेव्हा अझरबैजान-आर्मेनिया युद्ध सुरु झाले तेव्हा संरक्षण तज्ञांनी सांगितले होते की ही दोन लहान देशांमधील लढाई आहे आणि ते दोघे आपापसात सोडवतील. त्याचा परिणाम असा झाला की, निसर्गाचे वरदान मिळालेल्या अझरबैजानची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली.

त्याचवेळी, आर्मेनियन सैन्याला शस्त्रास्त्रांची कमतरता भासू लागली. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अजूनही सुरु आहे. आज वर्षभराहून अधिक काळ लोटला पण दोन्ही देश मागे सरायला तयार नाहीत.

हे पाहता संरक्षण तज्ज्ञांनी तिसरे महायुद्ध होण्याची भीती व्यक्त केली होती. दरम्यान, इस्रायल आणि हमास आमनेसामने आले. या 6 देशांची युद्धाची पद्धत पाहून भारतीय लष्करानेही वेगळ्या रणनीतीवर काम सुरु केले आहे.

भारताचे नवीन सुरक्षा धोरण

दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) 10 देशांच्या ASEAN (Association of Southeast Asian Nations) च्या नव्या सुरक्षा रणनीतीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राजनाथ सिंह दोन दिवस इंडोनेशियाला जाणार आहेत.

या बैठकीत उदयोन्मुख क्षेत्रीय सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ASEAN संरक्षण मंत्र्यांच्या या ADMM-Plus बैठकीत भारत प्रमुख सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्याबाबत आपले विचार मांडू शकतो.

Rajnath Singh
ASEAN-India Summit: मोदींचे इंडोनेशियामध्ये जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ

आसियान देशांची बैठक

ASEAN देशांची ही बैठक 16 ते 17 नोव्हेंबर 2023 दरम्यान इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे होणार आहे. या बैठकीला ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि त्यांचे 8 भागीदार भारत (India), अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सहभागी होणार आहेत. ADMM-Plus चे अध्यक्ष म्हणून इंडोनेशिया या बैठकीचे आयोजन करत आहे. 1992 मध्ये भारत आसियान परिषदेत सामील झाला होता.

Rajnath Singh
ASEAN-India Summit: 'आमची भागीदारी 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण करेल'

बैठकीत महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत

परंतु 2017 पासून, ADMM-प्लस मंत्री संरक्षणाच्या बाबतीत एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी बैठक घेत आहेत. या आसियान बैठकीत सायबर सुरक्षा, लष्करी वैद्यकीय आणि दहशतवाद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या जागतिक समस्या आहेत, ज्यांचा परिणाम आजतागायत जवळजवळ प्रत्येक देशावर होत आहे.

याशिवाय, गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींच्या प्रकोपाचाही सामना संपूर्ण जग करत आहे. भूकंप, ढगफुटी, पूर, चक्रीवादळे यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी कशी टाळता येईल यावरही महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. 2024-2027 साठी सह-अध्यक्षांचा पुढील सेट देखील 10 व्या ADMM-प्लस दरम्यान घोषित केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com