Nobel In Chemistry 2022
Nobel In Chemistry 2022Dainik Gomantak

Nobel Prize In Chemistry: बेरटोझी, मेलडॉल, शार्पलेस यांना केमिस्ट्रीचे नोबेल जाहीर

क्लिक केमिस्ट्री, बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी केलेल्या कामाचा गौरव
Published on

Nobel Prize In Chemistry: स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे सध्या नोबेल प्राईझ वीक सुरू असून यात बुधवारी रसायनशास्त्रासाठीचा (Chemistry) नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Nobel In Chemistry 2022
Melinda Bill Gates Divorce: बिल गेट्स यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मेलिंडा यांचे मोठे वक्तव्य

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॅरोलिन बेरटोझी, डेन्मार्क येथील कोपेनहेगन विद्यापीठाचे मॉर्टेन मेलडॉल आणि अमेरिकेतील स्क्रिप्स रिसर्च सेंटरचे के. के. बॅरी शार्पलेस या तिघांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्रीच्या विकासासाठी या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या, गुरूवारी साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला जाणार आहे.

Nobel In Chemistry 2022
Nobel In Physics: क्वांटम इन्फर्मेशनवर संशोधन करणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना पदार्थविज्ञानाचे नोबेल

दरम्यान, मंगळवारी पदार्थविज्ञान विषयातील नोबेल पुरस्कार अॅलेन आस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉसर आणि अँटन जेलिंगर या शास्त्रज्ञांना क्वांटम इन्फर्मेशन सायन्स आणि फोटॉन्सवर संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अॅलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे आहेत. ते पॅरिस आणि स्केले विद्यापीठात प्राध्यापक आहेत. जॉन एफ. क्लॉसर हे अमेरिकन संशोधक आणि प्राध्यापक आहेत. तरक अँटन जेलिंगर हे संशोधक असून ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्रमुख आहेत.

तर सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल स्वीडनचे स्वांते पाबो यांना जाहीर झाले होते. १० ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल प्राईझची घोषणा केली जाईल. या पुरस्कारांचे वितरण डिसेंबरमध्ये स्टॉकहोममध्ये केले जाते. केवळ शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार नॉर्वेमध्ये प्रदान केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com