Nobel In Physics: क्वांटम इन्फर्मेशनवर संशोधन करणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना पदार्थविज्ञानाचे नोबेल

फ्रान्सचे अॅलेन आस्पेक्ट, अमेरिकेचे जॉन क्लॉसर, ऑस्ट्रियाचे अँटन जेलिंगर या संशोधकांनी जिंकले नोबेल
Nobel Prize in Physics 2022
Nobel Prize in Physics 2022Dainik Gomantak

Nobel In Physics: युरोपमधील स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे सध्या नोबेल प्राईझ वीक सुरू आहे. या वीकमधील दुसऱ्या दिवशी मंगळवारी पदार्थविज्ञान विषयातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. अॅलेन आस्पेक्ट, जॉन एफ. क्लॉसर आणि अँटन जेलिंगर अशी या विजेत्यांनी नावे आहेत. क्वांटम इन्फर्मेशन सायन्स आणि फोटॉन्सवर संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Nobel Prize in Physics 2022
Dubai Hindu Mandir: दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार दूबईत हिंदू मंदिराचे उद्घाटन

अॅलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे आहेत. ते पॅरिस आणि स्केले विद्यापीठात प्राध्यापक आहेत. जॉन एफ. क्लॉसर हे अमेरिकन संशोधक आणि प्राध्यापक आहेत. तरक अँटन जेलिंगर हे संशोधक असून ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्रमुख आहेत.

कशाविषयी केले संशोधन?

नोबेल कमिटीने म्हटले आहे कीत, या तिन्ही शास्त्रज्ञांनी एन्टँगल्ड क्वांटम स्टेटसवर संशोधन केल. यात दोन पार्टिकल्सचे वर्तन अगदी सारखे असते. जर या दोन्ही पार्टिकल्सना वेगळे केले गेले तरी त्यांचे वर्तन बदलत नाही. या संशोधनाचा फायदा नव्या तंत्रज्ञानाला तर होणारच आहे. पण फिजिक्सच्या क्वाँटम इन्फर्मेशन थेरीमध्येदेखील त्यामुळे भर पडणार आहे. अनेक गंभीर आजारांवर उपचाराचे नवे मार्ग त्यामुळे मिळू शकतात. क्वाँटम कम्प्युटर्स, क्वाँटम नेटवर्क्स आणि क्वाँटम एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन या विषयातील संशोधनात त्यामुळे क्रांती घडू शकते. क्वाँटम मेकॅनिक्सलाही त्यामुळे नवी दिशा मिळू शकते.

Nobel Prize in Physics 2022
World Animal Day: औषध अन् सौंदर्यप्रसाधनांसाठी 'या' प्राण्यांवर केले जाते सर्वाधिक रिसर्च

दरम्यान, नोबेल प्राईज वीक १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सात दिवसात एकूण सहा नोबेल पुरस्कार जाहीर केले जातील. सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल स्वीडनचे स्वांते पाबो यांना जाहीर झाले होते. सर्वात शेवटी १० ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल प्राईझची घोषणा केली जाईल.

गतविजेत्यांनाही यंदा आमंत्रण

या पुरस्कारांचे वितरण डिसेंबरमध्ये होईल. पुरस्कारांचे वितरण स्टॉकहोममध्ये केले जाते केवळ शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार नॉर्वेमध्ये प्रदान केला जातो. दरम्यान, २०२० आणि २०२१ या सालातले नोबेल विजेते कोरोना महारोगराईमुळे स्टॉकहोममध्ये येऊ शकले नव्हते. त्यामुळे नोबेल कमिटने त्यांनाही या वर्षी स्टॉकहोममध्ये आमंत्रित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com