Melinda Bill Gates Divorce: बिल गेट्स यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मेलिंडा यांचे मोठे वक्तव्य

Melinda Gates Foundation: बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 30 वर्षानंतर मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.
Melinda Gates & Bill Gates
Melinda Gates & Bill Gates Dainik Gomantak

Bill Gates Net Worth: बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 30 वर्षानंतर मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. ऑगस्ट 2021 मध्ये घटस्फोट निश्चित झाला. परंतु जोडप्याने जाहीर केले होते की, 'आम्ही बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन सुरु ठेवणार आहोत.' यातच आता फॉर्च्युन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मेलिंडा गेट्स यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला. मेलिंडा यांनी या मुलाखतीत पती बिल गेट्स यांच्यापासून घेतलेल्या घटस्फोटाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.

'हे खूप वेदनादायक आहे'

मेलिंडा म्हणाल्या, 'माझ्याकडे काही कारणं होती, ज्यामुळे मी ते नातं पुढे घेऊन जाऊ शकत नव्हते.' 58 वर्षीय मेलिंडा पुढे म्हणाल्या, 'अगणित कारणांमुळे हे अत्यंत वेदनादायी आहे, परंतु गोपनीयतेमुळे मी यातून बाहेर पडू शकले.'

Melinda Gates & Bill Gates
परराष्ट्र मंत्री जयशंकर आजपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत न्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर

दुसरीकडे, बिल आणि मेलिंडा यांनी 1994 मध्ये लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत - जेनिफर, रोरी आणि फोबी. मेलिंडा यांनी पुढे असेही सांगितले की, कोविड-19 मुळे मला जे काही करणे आवश्यक होते ते सर्व काही केले. मेलिंडा पुढे म्हणाल्या, 'मी ज्या व्यक्तीपासून दूर जात आहे, त्याच्यासोबत मी काम करत राहीन.'

'मला माझे सर्वोत्तम द्यायचे होते'

त्या पुढे म्हणाल्या, 'जरी मी सकाळी 9 वाजता रडत बसले असेल तरी सकाळी 10 वाजता मला व्हिडिओ कॉन्फरन्सवर यावे लागत होते, तेही मी ज्या व्यक्तीला सोडत होते त्याच्यासोबत. मला आत्ता फाऊंडेशनसाठी माझं बेस्ट द्यायचं आहे.'

Melinda Gates & Bill Gates
'चीनने कराराचे पालन केले नाही', सीमा वादावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य

यापूर्वी, संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी मागील दोन वर्षांचे वर्णन 'अत्यंत नाट्यमय' असे केले होते. ते म्हणाले होते की, 'कोरोना (Corona) काळात मुलांना सोडून जाणे ही सर्वात वाईट गोष्ट होती. मी ते बदलू शकलो नाही. परंतु मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com