
सर्वोच्च जागतिक पुरस्कार म्हणून प्रसिद्ध असणारा नोबेल पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. २०२५ या वर्षीचा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर करण्यात आला आहे. परिधीय रोगप्रतिकारक शक्तीबद्दल त्यांनी केलेल्या शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
"शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित केली पाहिजे, अन्यथा ती आपल्या अवयवांवर हल्ला करू शकते. मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांनी शरीराला हानी पोहोचवण्यापासून रोखणाऱ्या परिधीय रोगप्रतिकारक शक्तीबद्दलच्या त्यांच्या अभूतपूर्व शोधांसाठी २०२५ चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे", असे नोबेलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
नव्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाचे मार्ग खुले झाले आहेत. यामुळे नव्या उपचारपद्धतींचा देखील शोध घेता येणार आहे. तसेच, विविध प्रकारच्या रोग, कर्करोगावरील उपचार आणि स्टेम सेलच्या ट्रान्सप्लांटनंतर होणाऱ्या त्रासापासून देखील बचाव करता येणार आहे.
मेरी ब्रुंको यांचा १९६१ रोजी जन्म झाला असून, त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पी.एचडी केली आहे. अमेरिकेतील जीवशास्त्र संस्थेत त्या वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात.
तर, फ्रेड रॅम्सडेल यांचा १९६० रोजी जन्म झाला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी १९८७ मध्ये पीएचडी घेतली आहे. तसेच, १९५१ मध्ये जन्मलेले शिमोन साकागुची यांचे शिक्षण एमडी (१९७६) आणि १९८३ मध्ये क्योटो विद्यापीठातून पीएचडी घेतली आहे. ओसाका संशोधन विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.