Tawang Clash: तवांग चकमकीनंतर एअरफोर्स इन अ‍ॅक्शन; सीमेवर लढाऊ विमानांची संख्या वाढवली...

ईशान्य भारतात करणार युद्धसराव; संपुर्ण एलएसीवर ठेवणार पाळत
Indian Air Force Fighter jet
Indian Air Force Fighter jet Dainik Gomantak

Aif Force In Action After Tawang Clash: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीनंतर भारतीय हवाई दल (Indian Air Force) सतर्क झाले आहे. या आठवड्यात ईशान्य भारतात एअरफोर्सतर्फे युद्धसराव केला जाणार आहे. सीमेवर लढाऊ विमानांची संख्याही वाढवली जात आहे.

Indian Air Force Fighter jet
Chinese Infiltration: भारतीय कंपन्यांमध्ये ‘चीनी’ घुसखोरी; धक्कादायक माहिती आली समोर

भारतीय हवाई दल अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय हवाई दलाने या भागात लढाऊ विमानांची संख्या वाढवली आहे. चीनी अतिक्रमणाचा प्रयत्न पाहता हवाई दलाने या भागात संपूर्ण पाळत ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून मानक कार्यप्रणालीचे पालन केले जात आहे, त्यानुसारच तैनातीमध्ये लढाऊ विमानांची संख्या वाढवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईशान्येकडे युद्धसराव करण्याचे नियोजन खूप आधीपासूनच सुरू होते.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनी सैनिकांत झालेल्या चकमकीत अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत चीनलाच सर्वाधिक फटका बसला आहे. चीनी सैन्याने तवांगमधील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला होता.

Indian Air Force Fighter jet
Chinese Infiltration: भारतीय कंपन्यांमध्ये ‘चीनी’ घुसखोरी; धक्कादायक माहिती आली समोर

9 डिसेंबरला तवांगमध्ये झालेल्या या चकमकीनंतर दोन्ही देशांच्या कमांडर्सची फ्लॅग मीटिंग झाली, त्यानंतर दोन्ही बाजूचे सैनिक मागे हटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) लोकसभेत तवांग चकमकीवर माहिती दिली. ते म्हणाले की, "आमच्या सैनिकांनी धैर्याने पीएलएला भारताच्या भूभागावर अतिक्रमण करण्यापासून रोखले." दरम्यान, भारतीय सैन्याने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडली असा दावा चीनने केला आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले की, यांगत्से माझ्या मतदारसंघांतर्गत असून दरवर्षी मी जवानांना आणि ग्रामस्थांना भेटायला जातो. आता 1962 राहिलेले नाही. जर कोणी मर्यादा भंग करण्याचा प्रयत्न केला तर आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतात. आमचे जवान विटेचे उत्तर दगडाने नाही तर लोखंडाने देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com