Tawang Clash: चीनच्या भ्याडपणावर उमर अब्दुल्लांना आठवले 'वाजपेयी', म्हणाले...

Tawang Clash latest update: अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीवरुन वाद वाढत आहे.
Omar Abdullah
Omar AbdullahTwitter/ @ANI
Published on
Updated on

Tawang Clash latest update: अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीवरुन वाद वाढत आहे. केंद्र सरकारवर पुन्हा एकदा विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. केंद्राचा हा नापाक प्रयत्न म्हणजे केंद्राचे अपयश असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांवर त्यांनी केंद्राला घेरले.

उमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर निशाणा साधला

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो, हे दुर्दैवी असल्याचे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानसोबतच्या आपल्या संबंधांचे सत्य कोणापासून लपलेले नाही. चीनसोबतही काही गोष्टी घडताना दिसत नाहीत. आतापर्यंत त्यांनी (चीनी सैनिक) लडाखमधून पूर्णपणे माघार घेतलेली नाही, आणि आज अरुणाचल प्रदेशातही (Arunachal Pradesh) काही चकमक झाल्याची बातमी येत आहे.

Omar Abdullah
Rajnath Singh On Tawang Clash: राजनाथ सिंह यांचे तवांग मुद्द्यावर संसदेत विरोधकांना दिले उत्तर

अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण आली

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करुन ते पुढे म्हणाले की, 'त्यांनी (अटलबिहारी वाजपेयी) म्हटले होते की, मित्र बदलता येतात... पण शेजारी नाही. आपण आपले शेजारी बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवू शकतो.' अब्दुल्ला पुढे म्हणाले की, 'परंतु टाळी एका हाताने वाजत नाही, दोन हातांनी वाजते. आपल्याशी चांगले संबंध ठेवणे आणि अशा कारवाया थांबवणे ही चीनचीही जबाबदारी आहे.'

Omar Abdullah
Tawang Clash: तवांगमधील चकमकीवर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन, सीमा वादावर म्हणाले...

या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले

ते पुढे म्हणाले की, चकमकीत दोन्ही बाजूंचे काही सैनिक जखमी झाले आहेत, परंतु एकही भारतीय सैनिक मारला गेला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. यानंतर, 11 डिसेंबर रोजी स्थानिक आर्मी कमांडरने आपल्या चिनी समकक्षासोबत फ्लॅग मीटिंग घेतली. जिथे चीनच्या (China) बाजूने सीमेवर शांतता राखण्यास सांगितले होते. राजनाथ सिंह म्हणाले की, 'हे प्रकरण चीनच्या बाजूने राजनयिक पातळीवरही मांडण्यात आले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com