VIDEO: चीनमधील सर्वात उंच 'होंगची पूल' कोसळला! काही सेकंदात पुलाचे खांब नदीत धसले; भूस्खलनाचा थरार व्हिडिओमध्ये कैद

China Hongqi Bridge Collapse: चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांतात नुकताच उद्घाटन झालेला होंगची पूल अचानक भूस्खलनामुळे कोसळला. मंगळवारी (11 नोव्हेंबर) दुपारी ही दुर्घटना घडली.
China Hongqi Bridge Collapse
China Hongqi Bridge CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

China Hongqi Bridge Collapse: चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांतात नुकताच उद्घाटन झालेला होंगची पूल अचानक भूस्खलनामुळे कोसळला. मंगळवारी (11 नोव्हेंबर) दुपारी ही दुर्घटना घडली. भीषण भूस्खलनाने पुलाच्या एका मोठ्या भागाला आपल्या कवेत घेतले. या भूस्खलनामुळे पुलाचा एक मोठा भाग नदीत कोसळला आणि परिसरात धुळीचे आणि मातीच्या ढिगाऱ्याचे लोट पसरले.

भूस्खलनाचा थरार व्हिडिओमध्ये कैद

अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, भूस्खलनामुळे काही सेकंदातच पुलाचे खांब डळमळीत होऊन नदीत कोसळले. हा पूल (Bridge) अंदाजे 758 मीटर लांबीचा होता आणि चीनच्या मध्य भागातून तिबेटला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा तो एक महत्त्वाचा भाग होता.

China Hongqi Bridge Collapse
PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

प्रशासनाने घेतली होती खबरदारी

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील संभाव्य धोका लक्षात घेऊन अगोदरच खबरदारी घेण्यात आली होती. रॉयटर्सच्या अहवालानुसार, पुलाजवळील टेकड्यांवर आणि रस्त्यावर भेगा आणि जमिनीमध्ये हालचाल दिसल्यानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवार दुपारपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. प्रशासनाने दक्षता म्हणून वाहतूक थांबवल्यानंतर झालेल्या भूस्खलनात पूल कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मंगळवारी परिस्थिती अचानक बिघडली आणि झालेल्या जोरदार भूस्खलनाने पुलाचा मोठा भाग कोसळला.

China Hongqi Bridge Collapse
China Robot Traffic Cop: आता रोबोट करणार ट्रॅफिक कंट्रोल! 'या' ठिकाणी प्रयोग यशस्वी

गुणावत्ता आणि भूवैज्ञानिक अस्थिरता

हा पूल कोसळल्याच्या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी पुलाच्या बांधकामाच्या वेगावर टीका केली आणि 'गुणावत्तेवर अधिक लक्ष देण्याची' गरज व्यक्त केली. तर काहींनी भूस्खलनाची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे हा केवळ पुलाच्या बांधकामाचा दोष नाही, असे मत मांडले. प्राथमिक अहवालांनुसार, या अपघाताचे मुख्य कारण भूवैज्ञानिक अस्थिरता हेच आहे. हा परिसर डोंगराळ आहे आणि भूस्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील आहे, ज्यामुळे येथे विकासकामे करणे नेहमीच आव्हानात्मक असते.

China Hongqi Bridge Collapse
China India Threat: पाकिस्तान नव्हे, भारताचा खरा शत्रू चीन! अमेरिकन गुप्तचर अहवालात धक्कादायत दावा, काय आहे Report? वाचा..

तांत्रिक तपास सुरु

स्थानिक प्रशासनाने या अपघाताच्या घटनेची तांत्रिक चौकशी सुरु केली आहे. पुलाच्या डिझाइनमध्ये किंवा बांधकामात कोणतीही त्रुटी होती का, हे शोधून काढणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे. चीनच्या (China) पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या सुरक्षिततेवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com