ब्राझीलमध्ये लसखरेदी गैरप्रकाराविरोधात देशव्यापी आंदोलन

ब्राझीलमधील जनतेनं रस्त्यावर उतरुन ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो (President Jer Bolsnaro) यांच्याविरोधात निदर्शनांची मालिका सुरु केली आहे.
President Jer Bolsnaro
President Jer BolsnaroDainik Gomantak

रिओ डी जानिरो : जगभरात डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) प्रसार वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलमधील (Brazil) कोरोना लस खरेदी भ्रष्टाचार प्रकरणाची (Corona Vaccine Corruption) फौजदारी चौकशी करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून या प्रकरणी आता प्रचंड जनक्षोभ उफाळून येऊ लागला आहे. ब्राझीलमधील जनतेनं रस्त्यावर उतरुन ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो (President Jer Bolsnaro) यांच्याविरोधात निदर्शनांची मालिका सुरु केली आहे.

आंदोलकांनी 40 शहरांत शेकडो ते हजारोच्या संख्येने निदर्शने सुरु केली आहेत. अध्यक्ष बोल्सेनारो यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला दाखल करण्यात यावा किंवा कोरोनाची लस मोठ्याप्रमाणात खरेदी करण्यात यावी अशा मागण्या आंदोलक जनतेकडून करण्यात येत आहे. ब्राझीलमधील पारा या राज्यातील बेलेम येथे एका आंदोलकाने सांगितले की, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना एक मिनिट शांतता पाळून श्रध्दांजली वाहण्याचे ठरवल्यास 2022 हे वर्ष उजाडेल एवढे मृत्यू कोरोनामुळे ब्राझीलमध्ये झाले आहेत.

President Jer Bolsnaro
फिलीपीन्समध्ये लष्करी विमानाचा मोठा अपघात; 85 जवान ठार

ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोझा लेबर यांनी म्हटले की, कोरोना साथीची हाताळणी करण्यावरुन सेनेटच्या समितीमार्फत चौकशीला आम्ही मान्यता देत आहोत. अध्यक्ष बोल्सोनारो यांनी कोरोना परिस्थीती हाताळताना बेपार्वाई करुन काही गुन्हा केला आहे का याचा तपास अभियोक्तो करीत आहेत. बोल्सोनारो यांच्या राजवटीमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

लस खरेदीबाबच दबाव

आरोग्य मंत्रालयाच्या आयात विभागाचे प्रमुख असणारे लुईस रिकाडरे मिरांडा (Luis Ricardo Miranda) यांनी म्हटले आहे की, भारत बायोटेक या कंपनीकडून (Bharat Biotech Company) 2 कोटी लसी खरेदी करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यामध्ये 4.5 कोटी रुपये सिंगापूरमधील कंपनीच्या माध्यमातून अदा करण्यात आले आहेत.

दरम्यान, भारताच्या भारत बायोटेक कंपनीने त्यांना कोणतेही अग्रीम पैसे मिळाले असल्याचा नकार दिला आहे. 25 जून रोजी मिरांडा यांनी सेनेटपुढे असे सांगितले की, आम्ही कोरोनाची लस खेरदीतील गैरप्रकार पोलिसांनी कळवण्याचे बोल्सोनारो यांनी सांगितले होते परंतु फेडरल पोलिसांकडे तशी तक्रार करण्यात आली नाही.

President Jer Bolsnaro
कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा WHO चा उपक्रम सुरु

बनावट कागदपत्रे मिरांडा बंधूंनी सादर केली असा उलट आरोप अध्यक्ष बोल्सोनारो यांचे महासचिव ओनिक्स लोरेझोनी यांनी केला आहे. बोल्सोनारो यांनी या दोघा बंधूच्या चौकशीचे आदेश यांनी दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com