कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याचा WHO चा उपक्रम सुरु

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) उपक्रमाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे.
Coronavirus
CoronavirusDainik Gomantak

बीजिंग : जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोना विषाणूचे मूळ शोधण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) उपक्रमाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे, मात्र अशाप्रकारचा तपास जागतिक आरोग्य संघटनेला शक्य होईल काय, तो कितपत विश्वासार्ह असेल, असे प्रश्न अनेक वैज्ञानिकांनी उपस्थित करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या काही तज्ञांनी असे म्हटले आहे की, चीन (China) अमेरिका (America) यांच्यात राजकिय तणाव असताना संयुक्त राष्ट्रांची जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणूचे मूळ विश्वासार्ह पध्दतीने शोधू शकत नाही. या विषाणूचे मूळ शोधायचे असेल तर 1986 मध्ये चेर्नोबिल अणु दुर्घटनेच्या (Chernobyl Nuclear Accident) नंतर जसे निष्पक्ष पथक नेमूण चौकशी करण्यात आली होती. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेनं मार्चमध्ये कोरोनाच्या उगमाबाबत पहिला अभ्यास जाहीर केला होता. त्यात हा विषाणू प्राण्यामधून माणसाकडे आला व तो वुहानच्या प्रयोगशाळेमधून (Wuhan's laboratory) सुटलेला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.

Coronavirus
'या' नऊ युरोपीय देशांनी 'कोविशील्ड' ला दिली मान्यता

आता जागतिक आरोग्य संघटनेनं पुढील टप्प्यातील चौकशी करत असताना त्यात पहिल्या कोरोना रुग्णाबाबत माहिती घेचली जाणार आहे आणि तो कोणत्या प्राण्यामधून प्रसारीत होवून तो माणसात आला यावर भरह दिला जाणार आहे. वटवाघळातून हो कोरोना विषाणू माणसामध्ये आला आणि अजूनही काही प्राणी या विषाणूचे मध्यस्थ असू शतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आणि चीनचे म्हणणे आहे.

Coronavirus
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

WHO चे सार्वजिनक आरोग्य कायदा आणि मानवी हक्क अध्यक्ष लॉरेन्स गोस्टीन यांनी म्हटले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या भरवशावर राहून कोरोना विषाणूचे मूळ शोधणे हे चुकीचे आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेला चीनने नेहमीच असहकार्य केले असून फसवणूक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com