फिलीपीन्समध्ये लष्करी विमानाचा मोठा अपघात; 85 जवान ठार

फिलिपिन्समध्ये (Philippines) 85 सैनिकांना (soldier) घेऊन जाणारे लष्करी विमान (Military aircraft) कोसळले आहे.
फिलिपिन्समध्ये  85 सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी विमान कोसळले
फिलिपिन्समध्ये 85 सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी विमान कोसळले Dainik Gomantak

फिलिपिन्समध्ये (Philippines) 85 सैनिकांना (soldier) घेऊन जाणारे लष्करी विमान (Military aircraft) कोसळले आहे. फिलिपिन्सच्या लष्कर प्रमुखांनी याबाबत माहिती दिली आहे. वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, क्रॅश लष्करी विमान सी -130 पडल्यानंतर पेट घेतला होता. या आगीतून आतापर्यंत 40 लोकांची सुटका करण्यात आली आहे. या एजन्सीने म्हटले आहे की, सैनिकी विमान भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुलु प्रांतातील जोलो बेटावर (Jolo Island) उतरण्याचा प्रयत्न करीत होता, जेव्हा ते क्रॅश झाले.(A military plane carrying 85 soldiers has crashed in the Philippines.)

सशस्त्र सेना प्रमुख सिरिलिटो सोबेजाना (Cirilito Sobejana) म्हणाले की, "बचाव दल क्रॅश ठिकाणी पोहोचले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रार्थना करीत आहेत." पीटीआयने सैन्यप्रमुख सिरिलितो सोबेजानाचा हवाला देत म्हटले आहे की या अपघातात 40 जणांची सुटका झाली आहे.

फिलिपिन्समध्ये  85 सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी विमान कोसळले
UFO आणि एलियन्सची रहस्यमय कहाणी; सिचुआन प्रांताची मूर्ती उघडते अनेक रहस्य

हा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगूत सोबेजाना यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, “कॅग्यान डी ओरो (मिंडानाओच्या दक्षिणेकडील बेटावर) येथून आमच्या सैन्याच्या जवानांना घेऊन जाताना विमान धावपट्टीवरुन घसरले, यावेळी पायलटने त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही." मुस्लिमबहुल सुलु प्रांतातील सरकारी सैन्ये अनेक दशकांपासून अबू सय्यफच्या अतिरेक्यांशी लढत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com