Maruti Electric Car कधी येणार बाजारात, काय म्हणाले अध्यक्ष आरसी भार्गव

Maruti Electric Car कधी येणार बाजारात, काय म्हणाले अध्यक्ष आरसी भार्गव

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली इलेक्ट्रिक वाहन योजना (Maruti Electric Car Scheme) जाहीर केली आहे. मारुतीच्या देशात सर्वाधिक कार विकल्या जातात. मारुती आता ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय देत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत कारच्या मार्केटमध्ये अनेक बदल होत आहेत. मारुती सुझुकी सध्या छोट्या कार आणि हायब्रीड तंत्रज्ञानावर काम करत आहे. मारुती सुझुकीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी म्हटले आहे की, सामान्य लोकांचे कार खरेदीचे स्वप्न देशात छोट्या कार आणि हायब्रीड मॉडेल्समुळे पूर्ण होऊ शकते.

मारुती सुझुकी यावर्षी आपला 40 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. . इकॉनॉमिक टाईम्सशी संवाद साधताना आरसी भार्गव यांनी मारुतीशी संबंधित मोठ्या योजनांचा खुलासा केला आहे. भारतात दोन कार बाजार आहेत - एक ग्रामीण भारत आणि एक शहरी भारत.

Maruti Electric Car कधी येणार बाजारात, काय म्हणाले अध्यक्ष आरसी भार्गव
Sonali Phogat Murder: संशयित एडवीन नुनीस याच्यासह साथीदारांना पाच दिवस पोलीस कोठडी

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा मार्ग हायब्रीड कारच्या मार्गे जातो. 2025 पर्यंत मारुती सुझुकी आपली पहिली ईव्ही लाँच करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात आणि जगात हायब्रीड कारचा ट्रेंड वाढत आहे.

मारुतीने अनेक हायब्रीड कार बाजारात आणल्या आहेत तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये देखील कंपनीने प्रवेश केला आहे. प्रथम हायब्रीड आणि नंतर इलेक्ट्रिक मेडिकलमध्ये स्विच केल्याने पारंपरिक कारच्या तुलनेत कंपनीच्या व्यवसायात सहज बदल होऊ शकतो, मारुतीने म्हटले आहे.

Maruti Electric Car कधी येणार बाजारात, काय म्हणाले अध्यक्ष आरसी भार्गव
Rudraksh Tips: रुद्राक्ष परिधान करताना 'या' चुका करू नका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com