Pakistan: 'पाकिस्तानात सत्तेच्या चाव्या आसिफ मुनीरकडेच...' संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दुसऱ्यांदा कबुली

Khawaja Asif Statement: देश हायब्रिड मॉडेलनुसार चालवला जातो. हायब्रिड मॉडेल असे, ज्यामध्ये सरकार आणि लष्कर मिळून देशासाठी धोरणे बनवतात.
Khawaja Asif statement
Khawaja Asif Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Defence Minister Khawaja Asif: आर्थिक हालाखीने त्रस्त असलेल्या पाकिस्तानचे सरकार कोणाच्या आदेशावर काम करते हे कोणापासूनही लपलेले नाही. जरी पाकिस्तानमध्ये लोकशाहीबद्दल बोलले जात असले आणि सार्वत्रिक निवडणुकांचे नाटक केले जात असले तरी पाकिस्तानमध्ये सत्तेच्या चाव्या पाकिस्तान लष्कराकडेच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जवळचे मानले जाणारे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले की, देश हायब्रिड मॉडेलनुसार चालवला जातो. हायब्रिड मॉडेल असे, ज्यामध्ये सरकार आणि लष्कर मिळून देशासाठी धोरणे बनवतात. मात्र पाकिस्तानमध्ये सत्तेची सूत्रे लष्कराकडेच आहेत.

ख्वाजा आसिफ यांची दुसऱ्यांदा कबुली

दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानमध्ये (Pakistan) हायब्रिड मॉडेलची कबुली दिली आहे. विश्लेषकांनी या व्यवस्थेवर बराच काळ टीका केली. ते खरे सत्तेचे मॉडेल नसून सहाय्यक हितसंबंधांची सेवा करणारे स्थिर सरकार म्हणून पाहतात. अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी ही कबुली दिली. एवढचं नाहीतर शरीफ यांचे सरकार पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने काम करत असल्याचे देखील ते म्हणाले.

Khawaja Asif statement
Pakistan: धरणे कोरडी पडली, शेतकरी त्रस्त, पाकिस्तानात पाण्याची वणवा; भारताच्या एका निर्णायाने पाकड्यांची जिरली!

'पाकिस्तानात हायब्रिड सरकार आहे'

आसिफ म्हणाले की, "हे एक हायब्रिड मॉडेल आहे. हे आदर्श लोकशाही सरकार नाही. पाकिस्तान आर्थिक आणि प्रशासनिक समस्यांमधून बाहेर येईपर्यंत याची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, "जर 1990 मध्ये असे मॉडेल असते तर पाकिस्तानच्या राजकारणातील गोंधळ आणि लष्करातील संघर्षाची परिस्थिती टाळता आली असती."

पीएमएल-एन आणि शरीफ यांच्यासाठी एकमेव वास्तववादी पर्याय म्हणजे सैन्याशी तडजोड करणे यावर आसिफ यांनी भर दिला. दरम्यान, आसिफ यांचे हे विधान अशा वेळी आले जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. आसिफ यांनी या भेटीचे वर्णन 78 वर्षातील सर्वात महत्त्वाचे वळण असल्याचे केले. हे हायब्रिड मॉडेलचे यश असल्याचे देखील ते म्हणाले. आसिफ यांच्या मते, हायब्रिड मॉडेलमध्ये नागरी सरकार आणि सैन्य दोघेही सहभागी असतात.

Khawaja Asif statement
Pakistan: पाकिस्तानी असणं हा कलंक! जॉर्जियात प्रवेश करण्यापासून रोखलं, 12 तास कैदेत ठेवलं...'त्या' व्यक्तीने सांगितली आपबिती

‘वोट को इज्जत दो’ ही फक्त एक घोषणा

हायब्रिड मॉडेल स्वीकारल्यानंतर, पीएमएल-एनचा प्रसिद्ध नारा “वोट को इज्जत दो” ही फक्त एक घोषणा राहिली. टीकाकारांचे म्हणणे आहे की, शरीफ यांनी पक्षाला सैन्यासोबत जोडले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका सर्वात मोठ्या फसवणुकीचा दावा केला. त्यांनी पीएमएल-एन आणि पीपल्स पार्टीवर जनादेश चोरल्याचा आरोप केला. डॉ. रसूल बख्श रईस म्हणाले की, आता हे उघड झाले की पाकिस्तानमध्ये सत्तेची खरी चावी कोणाकडे आहे? पाकिस्तान कोण चालवत आहे?

Khawaja Asif statement
Pakistan Inflation: भारताशी पंगा घेणं पाकड्यांना पडलं महागात; कर्जबाजारी पाकिस्तानात उडाला महागाईचा भडका

डॉ. रईस पुढे म्हणाले की, 2022 मध्ये इम्रान खान यांना सत्तेवरुन हटवून तिसऱ्यांदा हायब्रिड राजवट स्थापित करण्यात आली. नवीन पक्ष स्थापन करणारे जनरल झियाउल हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःला सैन्याच्या हवाली केले. ज्येष्ठ पत्रकार मतिउल्लाह जान यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली की, संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेणारे संरक्षणमंत्री हायब्रिड शासनाबद्दल बोलतात, तर पाकिस्तानच्या संविधानात या व्यवस्थेचा कोणताही उल्लेख नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com