Mexico Firing: मेक्सिको सिटीमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला तर दुसरा भारतीय जखमी झाला.
भारतीय अधिकाऱ्यांनी मेक्सिकोमधील त्यांच्या समकक्षांना लवकरात लवकर दोषींना पकडण्याचे आवाहन केले आहे. मृत भारतीय नागरिकाची अद्याप ओळख पटलेली नाही. ए
ल युनिव्हर्सल वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दोन बळींपैकी एकाचा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाला तर अन्य एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.
मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दुतावासाने सांगितले की, ते पीडितांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.
दूतावासाने रविवारी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर लिहिले की, ''ही अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना आहे. मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
दूतावास आणि 'इंडियन असोसिएशन ऑफ मेक्सिको' पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात असून सर्व प्रकारची मदत करत आहेत. आम्ही मेक्सिकन अधिकाऱ्यांकडे गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करतो.''
दुसरीकडे, मेक्सिको सिटीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केलेल्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूच्या अत्यंत दुःखद घटनेत दूतावास कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींच्या सतत संपर्कात आहे, दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असे दूतावासाने सोमवारी म्हटले आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्या.. त्याच वेळी, 'कॅपिटल प्रॉसिक्युटर ऑफिस'ने जाहीर केले आहे की, ते या प्रकरणावर भारतीय दूतावासाशी जवळून काम करत आहेत.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी (Police) शनिवारी ही घटना घडल्याचे सांगितले. या गुन्ह्याच्या घटनेत हल्लेखोरांनी भारतीय नागरिकांकडून 10000 अमेरिकन डॉलर्स लुटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.