Meta Connect Conference: स्मार्ट ग्लास ते AI पर्यंत... मेटाने उघडला भविष्यकालीन गॅझेट्सचा पिटारा

Meta ने त्यांच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये (Meta Connect Conference 2023) मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mark Zuckerberg
Mark ZuckerbergDainik Gomantak
Published on
Updated on

Meta ने त्यांच्या वार्षिक कनेक्ट कॉन्फरन्समध्ये (Meta Connect Conference 2023) अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या अनेक प्रोडक्ट्सच्या घोषणांचा समावेश आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या मेटा कंपनीने या कार्यक्रमात प्रामुख्याने तीन प्रोडक्ट्सची (मेटा क्वेस्ट 3, रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लास आणि मेटा एआय) घोषणा केली आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया...

Meta Quest 3

हे हेडसेट मॉडेल कंपनीचे सर्वोत्कृष्ट मॉडेल मानले जाऊ शकते, ज्यामध्ये वापरकर्त्याला हाय क्वालिटी डिस्प्ले आणि शानदार ग्राफिक्स मिळते. हे मागील व्हर्जनपेक्षा 10 पट चांगले कलर प्रदान करते आणि 110 डिग्रीच्या फील्ड ऑफ व्यूचा आनंद देऊ शकते. यात Qualcomm Snapdragon XR2 Gen 2 प्रोसेसर आहे. डिव्हाइस $500 मध्ये उपलब्ध आहे आणि त्यात Quest+ VR सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे.

Mark Zuckerberg
श्रीमंतांच्या यादीत Mark Zuckerberg ने मुकेश अंबानींना टाकले मागे, एकाच दिवसात कमावले 10 अब्ज डॉलर्सपेक्षा...

Ray-Ban Meta Smart Glass

दरम्यान, या प्रोडक्टची खासियत म्हणजे याच्या मदतीने तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जे पाहता ते थेट टेलीकास्ट करु शकता. कंपनीने रे-बॅनच्या सहकार्याने हा स्मार्ट ग्लास तयार केला आहे, ज्यामध्ये 12 एमपी कॅमेरा आणि एलईडी लाईटचा समावेश आहे. हे 150 डिग्री आणि डिझाइन कॉम्बोमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत $299 पासून सुरु होते.

Mark Zuckerberg
Mark Zuckerberg: बदनामी टाळण्यासाठी मार्क झुकरबर्गची कंपनी देणार 60 हजार कोटी! जाणून घ्या नेमकं प्रकरण

Meta AI

AI रेसमध्ये मागे पडू नये म्हणून कंपनीने अनेक AI बॉट्सची घोषणा केली आहे, ज्यापैकी एक Meta AI चा समावेश आहे. हे AI लवकरच नुकत्याच लॉन्च झालेल्या Quest 3 VR हेडसेटवर उपलब्ध करुन दिले जाईल, जे तुम्हाला ट्रिप प्लॅनचे नियोजन करण्यात मदत करेल. यासोबतच तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नांसाठीही या एआयचा वापर करु शकाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com