Maryam Nawaz: नवाझ शरीफ यांची लेक बनली पंजाबची CM; पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा...

Maryam Nawaz First Female CM In Pakistan: पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेत्या मरियम नवाज यांची पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.
Maryam Nawaz First Female CM In Pakistan
Maryam Nawaz First Female CM In PakistanDainik Gomantak

Maryam Nawaz First Female CM In Pakistan:

पाकिस्तानात नुकतीच सार्वत्रिक निवडणुक पार पडली. मात्र, कोणाचे सरकार स्थापन होणार याचा पेच आतापर्यंत सुटलेला नाही. यातच, पाकिस्तानच्या स्थापनेच्या 75 वर्षांनंतर प्रथमच एक महिला मुख्यमंत्री बनली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांची पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.

पाकिस्तानचे तीन वेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची लेक मरियम नवाज यांनी रविवारी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पंजाब प्रांत पाकिस्तानात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या प्रांताची लोकसंख्या 1.2 कोटींहून अधिक आहे.

दरम्यान, पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या पक्षाला आता पंजाब विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, पंजाब विधानसभेचे स्पीकर मलिक अहमद खान यांनी घोषणा केली की, पीएमएल-एनच्या मरियम नवाज यांची 220 मतांनी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, सुन्नी इत्तेहाद परिषदेचे (SIC) राणा आफताब खान यांना एकही मत मिळाले नाही, कारण त्यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. याआधी पंजाब विधानसभेच्या 337 निवडून आलेल्या आमदारांनी शुक्रवारी शपथ घेतली होती.

Maryam Nawaz First Female CM In Pakistan
Pakistan मध्ये दोन नंबरच्या पक्षाकडे पंतप्रधानपद, तर तिसऱ्या स्थानावरील पक्षाला राष्ट्रपतीपद

वृत्तानुसार, अधिवेशनाच्या सुरुवातीला स्पीकर मलिक खान यांनी राणा आफताब खान यांना बोलू दिले नाही. यानंतर ते आणि इतर एसआयसी आमदार सभागृहाबाहेर गेले. पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी आपली नियुक्ती देशातील प्रत्येक महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले. महिला (Women) नेतृत्वाची परंपरा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी त्यांना मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोघांसाठी काम करण्याची शपथ घेतली. "मला विरोधकांना एक संदेश द्यायचा आहे. माझ्या कार्यालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले असतील," असे त्या आपल्या भाषणादरम्यान म्हणाल्या.

Maryam Nawaz First Female CM In Pakistan
Pakistan Elections 2024: नवाझ शरीफ हरत होते, मग काटे कसे उलटे फिरले? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मरियम नवाज पुढे म्हणाल्या की, "आज, विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य येथे उपस्थित नाहीत याची खंत आहे. त्यांनी राजकीय आणि लोकशाही प्रक्रियेचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे." याआधी, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआय समर्थित सुन्नी इत्तेहाद कॉन्सिलच्या आमदारांनी मुख्यमंत्री निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com