भारत, बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळच्या 186 नागरिकांना Maldives करणार हद्दपार, चीनच्या एकाही नागरिकाचा समावेश नाही

India Maldives: नुकतेच मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक विधान केले होते, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
 Maldives to deport 186 citizens of India, Bangladesh, Sri Lanka and Nepal.
Maldives to deport 186 citizens of India, Bangladesh, Sri Lanka and Nepal.

Maldives to deport 186 citizens of India, Bangladesh, Sri Lanka and Nepal:

अवैध मार्गाने व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली 43 भारतीयांसह 186 परदेशी नागरिकांना मालदीव हद्दपार करणार आहे.

परदेशी नागरिकांना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या सर्वांवर मालदीवमधील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. विशेषत: सर्वांनीच अवैध मार्गाने व्यवसाय केल्याचा आरोप होत आहे.

मालदीवच्या गृहमंत्रालयाचा दावा आहे की, हे परदेशी लोक स्थानिक लोकांच्या नावाने व्यवसाय करत असले तरी पैसे मात्र आपल्या खात्यात जमा करत आहेत.

मालदीवच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सार्वजनिक निवेदनानुसार, 12 देशांतील एकूण 186 नागरिकांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी सर्वाधिक ८३ बांगलादेशी नागरिक आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर 43 भारतीय आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानावर 25 श्रीलंकन ​​आणि चौथ्या स्थानावर 8 नेपाळी नागरिक आहेत.

विशेष म्हणजे या यादीत एकही चिनी नागरिक नाही. मात्र, या 186 जणांना देश सोडण्याच्या अंतिम तारखेबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 Maldives to deport 186 citizens of India, Bangladesh, Sri Lanka and Nepal.
PM Modi In Dubai: 'लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा...' जागतिक नेत्यांना पीएम मोदींचा सल्ला

मालदीवमधून परदेशी लोकांच्या हद्दपारीच्या संदर्भात इमिग्रेशन कंट्रोलर शमन वाहिद म्हणाले की, अवैध धंदे करणाऱ्या परदेशी लोकांचा शोध घेण्यासाठी सतत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आणि पासपोर्ट आहेत त्यांना हद्दपार केले जाईल.

शमन म्हणाले की, इमिग्रेशन आणि पोलिसांची ही मोहीम कोणत्याही विशिष्ट गटाच्या विरोधात नाही.

 Maldives to deport 186 citizens of India, Bangladesh, Sri Lanka and Nepal.
युक्रेन युद्धातून माघार घेतल्यास Putin यांची हत्या होईल, Elon Musk यांचा खळबळजनक दावा

मालदीव सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात चालणारे सर्व अवैध धंदे बंद केले जातील. मालदीवचे गृहमंत्री अली इहुसान म्हणाले की, डिसेंबर 2021 मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकतेच मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक विधान केले होते, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com