World Largest Temple: जगातील सर्वात मोठे मंदिर कुठेयं तुम्हाला माहितीये का?

भारतात जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराबद्दल बोलतो, तेव्हा आपण सहसा तामिळनाडूमधील रंगनाथ स्वामी मंदिराचा संदर्भ देतो.
Cambodia Angkor Wat Temple
Cambodia Angkor Wat TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Cambodia Angkor Wat Temple: भारतात जेव्हा आपण जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराबद्दल बोलतो, तेव्हा आपण सहसा तामिळनाडूमधील रंगनाथ स्वामी मंदिराचा संदर्भ देतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 6 लाख 31 हजार स्क्वेअर मीटरमध्ये विस्तारलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर नाही.

या देशात जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

जगातील सर्वात मोठे मंदिर भारतात (India) नाही. हिंदूबहुल नसणाऱ्या देशात हे सर्वात मोठे मंदिर आहे. या देशाचे नाव कंबोडिया (Cambodia) आहे. मंदिराचे नाव 'अंगकोर वाट' आहे. हे मंदिर सिमरीप शहरात आहे. भगवान विष्णूच्या या मंदिराचे क्षेत्रफळ 8 लाख 20 हजार चौरस मीटर आहे. या मंदिराला (Temple) युनेस्कोने जागतिक वारसा म्हणूनही घोषित केले आहे. हे मंदिर जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, हे मंदिर इसवी सन 1112 ते 1153 काळात बांधले गेले.

Cambodia Angkor Wat Temple
Australia Census: हिंदू लोकसंख्येमध्ये झपाट्याने होतेय वाढ

दुसरीकडे, जगातील सर्वात मोठ्या मंदिराचा (Temple) आकार दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराच्या 4 पट आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराभोवती खंदकाच्या रुपात बनवलेले संरक्षक कवच असून ज्याची रुंदी 700 फूट आहे.

Cambodia Angkor Wat Temple
सौदी अरेबियाचे ऐतिहासिक पाऊल, दोन महिलांना दिली सरकारमध्ये मोठी जबाबदारी

तसेच, मंदिर एका उंच मचाणावर वसलेले आहे, ज्याचे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागात शिल्पे तयार करण्यात आली आहेत. मंदिरातील एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. प्रत्येक विभागात 8 घुमट आहेत. हे सर्व घुमट 180 फूट उंच आहेत. मुख्य मंदिर तिसऱ्या विभागाच्या छतावर आहे. सुमारे 1000 फूट रुंद मंदिरात प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा बनवण्यात आला आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या दगडी भिंतींनी मंदिर वेढलेले आहे. भिंतीनंतर 700 फूट रुंद खंदक आहे, त्यावर एका ठिकाणी 36 फूट रुंद पूल आहे. या पुलावरुन मंदिराच्या पहिल्या भागात जाता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com