दिल्ली ब्लास्टचं सेलिब्रेशन? एकमेकांना हार घालून केलं जोरदार स्वागत; POK मध्ये 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्यांचा जल्लोष VIDEO

LeT Celebration PoK Video: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या भीषण कार स्फोटाचा तपास सुरु असतानाच, पाक-व्याप्त काश्मीर मधून जल्लोष करतानाचा एक व्हिडिओ समोर आला.
Lashkar-e-Taiba Video
LeT Celebration PoK VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Lashkar-e-Taiba Video: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) झालेल्या भीषण कार स्फोटाचा तपास सुरु असतानाच, पाक-व्याप्त काश्मीर मधून जल्लोष करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडर्संनी तिथे एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान ते जल्लोष करताना दिसले.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये लष्करचे टॉप कमांडर फुलांचा वर्षाव करताना आणि एकमेकांना हार घालून स्वागत करताना दिसत आहेत. एवढचं नाहीतर, ते खूप आनंदी आणि उत्साहात दिसत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर लगेचच ही बैठक झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद त्या स्फोटाशी निगडित तर नाही ना, असा गंभीर संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आला आहे.

Lashkar-e-Taiba Video
Delhi Car Blast: दिल्ली ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन! संशयितांच्या चौकशीतून दहशतवादी संघटनेशी जुळले तार; जै-ए-मोहम्मदचा कमांडर निशाण्यावर

दहशतवाद्यांच्या उत्साहामागे दिल्ली स्फोट?

दिल्लीसारख्या संवेदनशील ठिकाणी मोठा स्फोट झाल्यानंतर पीओकेमध्ये लष्करच्या कमांडर्सकडून हा 'आनंद' साजरा करणे अनेक प्रश्न उपस्थित करतो. दहशतवाद्यांच्या हावभावात जो आनंद आणि उत्साह दिसत आहे, तो कशाबद्दल आहे? दिल्ली स्फोटानंतर लगेच त्यांनी इतकी मोठी आणि महत्त्वाची बैठक का घेतली? दहशतवादी नेमके काय 'सेलिब्रेट' करत आहेत, ज्यासाठी त्यांचे एवढे मोठे स्वागत केले जात आहे? भारतीय तपास यंत्रणांसाठी हा विषय आता पडताळणीचा बनला आहे. लष्करचा हा जल्लोष दिल्लीतील स्फोटात त्यांच्या सहभागाची महत्त्वाची कडी ठरु शकतो.

कोटलीमध्ये बैठक

सुरक्षा एजन्सी या बैठकीकडे गंभीरतेने पाहत आहेत, कारण यामागे एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. ही बैठक बुधवारी (12 नोव्हेंबर) पीओकेतील कोटली भागात झाली. या बैठकीत लष्कर-ए-तैयबाचे टॉप लीडर अब्दुल रऊफ आणि रिझवान हनीफ यांनी हजेरी लावली.

Lashkar-e-Taiba Video
Delhi Blast: कट उघड होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीतील स्फोट? धागेदोरे फरिदाबाद-पुलवामात; संशयित डॉक्टरच्या DNA चे घेतले नमुने

रिझवान हनीफची महत्त्वाची भूमिका

रिझवान हनीफ हा केवळ लष्करचा कमांडर नाही, तर तो दोन मोठ्या दहशतवादी संघटनांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हनीफ हा लष्करच्या पीओके युनिटचा उप प्रमुख आहे. तो लष्कर-ए-तैयबा आणि दुसरी मोठी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या दोघांमधील मुख्य दुवा म्हणून काम करतो. तसेच, तो 'हिलाल-उल-हक ब्रिगेड' नावाच्या एका संयुक्त Combat Unit ची कमानही सांभाळतो. ही ब्रिगेड लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांनी मिळून बनवलेली असून ती उघडपणे पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या नावाने काम करते.

Lashkar-e-Taiba Video
Delhi Blast: कट उघड होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीतील स्फोट? धागेदोरे फरिदाबाद-पुलवामात; संशयित डॉक्टरच्या DNA चे घेतले नमुने

गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हबीब ताहिर याचेही रिझवान हनीफशी कनेक्शन होते, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व लिंक्समुळे लष्करच्या या बैठकीचा व्हिडिओ आणि माहिती भारतीय तपास यंत्रणांना दिल्ली स्फोटाच्या तपासासाठी सुगावा देऊ शकते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या या जल्लोषाच्या व्हिडिओने भारतीय सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणखी वाढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com