Delhi Car Blast: दिल्ली ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन! संशयितांच्या चौकशीतून दहशतवादी संघटनेशी जुळले तार; जै-ए-मोहम्मदचा कमांडर निशाण्यावर

Delhi Car Blast Pakistan Connection: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटाचे धागेदोरे आता थेट पाकिस्तानशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले.
Delhi Car Blast Pakistan Connection
Delhi Car BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Car Blast Pakistan Connection: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटाचे धागेदोरे आता थेट पाकिस्तानशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि तपास यंत्रणांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाला पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' (Jaish-e-Mohammed) याच्याशी जोडणारे महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

दहशतवादी कमांडरशी संबंधाची शक्यता

तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी डॉ. मुझम्मिल आणि इतरांच्या चौकशीतून हे कनेक्शन उघड झाले आहे. तपास यंत्रणांना शंका आहे की, डॉ. मुझम्मिल याचे पाकिस्तानमधील दहशतवादी मौऊद्दिन औरंगजेब आलम उर्फ अम्मार अल्वी याच्याशी संबंध असू शकतात. अम्मार अल्वी हा जैश-ए-मोहम्मदचा सीनियर कमांडर असून तो अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड आहे. सूत्रांनुसार, अल्वीच्या निशाण्यावर भारतातील अनेक मोठी शहरे होती. महत्त्वाचे म्हणजे, हे दहशतवादी (Terrorist) हल्ले घडवून आणण्यासाठी जुनी वाहने वापरण्याची योजना होती, असेही उघड झाले.

Delhi Car Blast Pakistan Connection
Delhi Car Blast: '..सर्वत्र रक्त सांडले होते, फार जवळून मृत्यू पाहिला'! डोळ्यातील पाणी पुसत सांगितला दिल्ली स्फोटाचा प्रत्यक्षानुभव

स्फोटाची भीषणता

10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ भररस्त्यात एका चालत्या कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. या घटनेत सुमारे 10 जणांचा मृत्यू, तर 25 हून अधिक जण जखमी झाले. सुरुवातीला हा सामान्य स्फोट मानला गेला, परंतु स्फोटाच्या तीव्रतेमुळे 30 हून अधिक वाहने जळून खाक झाली आणि दूरवर लोक अपघाताचे बळी ठरले. त्यामुळे कारमध्ये आयईडी (IED) किंवा इतर स्फोटक सामग्री असण्याची चर्चा सुरु झाली. स्फोटात दहशतवादी कनेक्शनचा संशय आल्यामुळे गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि इतर सुरक्षा एजन्सीकडे सोपवला.

संशयितांची कसून चौकशी

एनआयए (NIA) आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी या घटनेनंतर अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. स्फोटात सहभागी असलेल्या संशयितांमध्ये फरीदाबाद येथील काही डॉक्टरांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती चालवणारा उमर नावाचा व्यक्तीही डॉक्टर होता. ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांची कसून चौकशी सुरु असून, दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा पूर्ण पर्दाफाश करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

Delhi Car Blast Pakistan Connection
Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरण; 'क्रिकेट टीम' थोडक्यात बचावली, बस 40 मिनिटे आधी निघाल्याने टळला मोठा अनर्थ!

काँग्रेसकडून सरकारवर टीका

दिल्लीतील या गंभीर घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली. अल्वी यांनी विचारले की, या घटनेला जबाबदार कोण? तसेच, काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अजूनही फरार कसे आहेत? त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केवळ बैठका घेण्यावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल टीका केली. जर पाकिस्तान जबाबदार असेल, तर सरकारने त्वरित कठोर कारवाई करावी. अशावेळी संपूर्ण देश केंद्र सरकारसोबत आहे, असेही अल्वी म्हणाले.

या स्फोटाचे थेट पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी संबंध जोडले गेल्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com