Delhi Blast: कट उघड होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीतील स्फोट? धागेदोरे फरिदाबाद-पुलवामात; संशयित डॉक्टरच्या DNA चे घेतले नमुने

Delhi Red Fort Blast: दिल्ली पोलिसांनी या स्फोटांप्रकरणी बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा आणि स्फोटके कायद्यातील विविध तरतुदीअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Delhi explosion, Red Fort blast, Delhi car bomb
Delhi explosion, Red Fort blast, Delhi car bombDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली-श्रीनगर: राजधानी दिल्लीतील स्फोटाचे फरिदाबाद-पुलवामा कनेक्शन उघड झाले आहे. सुरक्षा दलांनी हरियानाच्या फरिदाबादेतील स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवाद्यांचे धाबे दणाणले होते.

या कारवाईनंतर सगळा कटच उघड होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यातील एकाने घाई- घाईत दिल्लीत स्फोट घडवून आणला असावा, असा संशय व्यक्त होतो आहे. दिल्लीतील आत्मघाती हल्ल्यात लाल किल्ला परिसरात स्फोटकांनी भरलेली मोटार घेऊन जाणारा डॉ. उमर नबी हा काश्मीरच्या पुलमावाचा रहिवासी आहे. या स्फोटामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

जम्मू- काश्मीर पोलिसांनी सखोल चौकशीसाठी नबीच्या आईच्या ‘डीएनए’चे नमुने घेतले आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्फोटाच्या घटनेचा पुन्हा आढावा घेतल्यानंतर याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी या स्फोटांप्रकरणी बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा आणि स्फोटके कायद्यातील विविध तरतुदीअन्वये गुन्हा दाखल केला आहे. या स्फोटातील मृतांची संख्या संख्या ही बारावर पोचली आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट घडण्याआधीच सुरक्षा दलांनी हरियानातून आठजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यातील एका दहशतवाद्याच्या घरातून २ हजार ९०० किलोग्रॅम एवढी स्फोटके जप्त करण्यात आली होती.

या कारस्थानामागे ‘जैशे- मोहंमद’ आणि ‘अन्सार गझावत उल- हिंद’ या दोन दहशतवादी संघटना असल्याचे उघड झाले आहे. काश्मीर, हरियाना आणि उत्तर प्रदेशामध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. याप्रकरणी डॉ. मुझम्मील गनी आणि डॉ. शाहीन सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही फरिदाबादेतील ‘अल फलाह’ विद्यापीठामध्ये कार्यरत होते.

उमरने मोटार चालविली

अल- फलाह विद्यापीठाशी संबंधित उमरच स्फोटके असलेली ‘ह्युंदाई आय-२०’ ही मोटार चालवीत होता असे उघड झाले आहे. संबंधित मोटारीसोबत तो काहीकाळ कार पार्किंगच्या परिसरामध्ये उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. इतर सहकाऱ्यांप्रमाणे आपणही पकडले जाऊ या भीतीपोटी त्याने दिल्लीत घाईतच स्फोट घडवून आणला.

काश्मीरचा रहिवासी

डॉ. उमर हा दक्षिण काश्मीरच्या पूलवामा जिल्ह्यातील लेथपुरातील रहिवासी असून त्यानेच स्फोट झालेल्या मोटारीमध्ये अमोनिअम नायट्रेट ठेवल्याचा संशय आहे. फरिदाबादेतील महाविद्यालयात तो कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याने काश्मीरला भेट दिली होती. स्वभावाने अत्यंत शांत असलेल्या उमरचा कुणीही जवळचा मित्र नाही. गावी आल्यानंतर तो फारसा कुणाशीही बोलत नसे, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Delhi explosion, Red Fort blast, Delhi car bomb
Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरण; 'क्रिकेट टीम' थोडक्यात बचावली, बस 40 मिनिटे आधी निघाल्याने टळला मोठा अनर्थ!

फुटेजची तपासणी सुरू

एनएसजी कमांडोना महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. मंगळवारी सकाळी ‘एनएसजी’च्या पथकाने न्यायवैद्यकच्या पथकासह घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. लाल किल्ल्याजवळ घटनास्थळी शीघ्र कृती दल (रॅपिड अॅक्शन फोर्स) तैनात करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार स्फोटानंतरच्या तपासाचा भाग म्हणून लाल किल्ला १३ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

Delhi explosion, Red Fort blast, Delhi car bomb
Delhi Blast: कारमधील प्रवाशांना 'स्फोटाची' कल्पना होती? चौकशी सुरू; भारत- नेपाळ सीमेवर सावधगिरीचा इशारा, बंदोबस्तात वाढ

‘ते’ तीन सूत्रधार

डॉ. मुझम्मील शकील

उच्चविद्याविभूषित, दाहौज येथील त्याच्या घरातून स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता.

डॉ. उमर नबी

ज्या मोटारीत स्फोट झाला ती उमरच चालवीत होता. तो काश्मीरचा रहिवासी, फरिदाबादेतील कारस्थानात सहभागी. ‘जैश’चा हस्तक असल्याचा संशय.

डॉ. शाहीन शाहीद

भारतात जैशे मोहंमदची महिला विंग सुरू करण्याच्या तयारीत होती. जमात- उल- मोमीनात या नव्या संघटनेची जबाबदारीही तिच्याकडे होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com