Google CEO Sundar Pichai: 12000 कर्मचाऱ्याना नारळ दिल्यानंतर आता गुगलचा मोठा निर्णय, पिचाई उचलणार मोठे पाऊल

कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती.
Google
GoogleDainik Gomantak

Google CEO Sundar Pichai: संपूर्ण जगात आर्थिक मंदी येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. त्यानंतर जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यास सुरुवात केली आहे.

कर्मचारी कपातीच्या लाटेत गुगलने देखील 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यानंतर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई एक मोठा निर्णय घेणार आहे. माहितीनुसार, गुगल कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या तयारीत आहे.

टाऊन हॉल येथे झालेल्या मिटिंगमध्ये गुगलच्या (Google) कर्मचाऱ्यांशी बोलताना पिचाई म्हणाले, वरिष्ठ पदावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येणार आहे. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगलने फक्त वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा केली आहे. मासिक पगारातील वेतनाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • सुंदर पिचाई यांना मिळाली होती मोठी वेतनवाढ

वरिष्ठांच्या बोनस कपातीची टक्केवारी किती असेल आणि किती काळ तशीच राहिल याविषयी सुंदर पिचाई यांनी अद्याप कोणतेही माहिती दिली नाही. कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती.

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटकडून ही वाढ मिळाली होती. 2020 च्याएका रिपोर्टनुसार, पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 2 मिलिअन डॉलर आहे. IFL हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई यांच्या नेटवर्थमध्ये 20 टक्क्यांनी खाली असून सध्या त्यांची नेटवर्थ 5,300 कोटी आहे.

  • 12,000 कर्मचाऱ्यांना देण्यात आले नारळ

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर 20 जानेवारीला गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्रात गुगलने म्हटले होते की, गुगलला 25 वर्षे झाली आहे. परंतु, सध्या गुगल कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com