प्रेमाने धोका दिला अन् कायद्यानं शिक्षा दिली! लग्नाशिवाय मुलाला जन्म दिलेल्या महिलेला अमानुष शिक्षा; धक्कादायक प्रकारानं खळबळ

Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabia: सौदी अरेबियातील कडक कायद्यांचा आणि मानवाधिकार उल्लंघनाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला.
Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabia
Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabiaai generated images
Published on: 
Updated on: 

Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabia: सौदी अरेबियातील कडक कायद्यांचा आणि मानवाधिकार उल्लंघनाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नाशिवाय मुलाला जन्म दिल्याच्या आरोपाखाली एका केनियन महिलेला 100 चाबकांचे फटके मारण्याची कठोर शिक्षा सुनावण्यात आली. 40 वर्षीय एस्थर वान्जा मुथोनी असे या पीडित महिलेचे नाव असून, त्या सौदी अरेबियात एका कुटुंबाकडे घरकामगार आणि मुलांची काळजी घेणाऱ्या म्हणून काम करत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, कामादरम्यान इजिप्तमधील एका पुरुषाशी असलेल्या संबंधातून त्या गर्भवती राहिल्या, मात्र तो व्यक्ती नंतर देश सोडून निघून गेला. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि पोलिसांनी (Police) तातडीने मुथोनी यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, मुथोनी आपल्या एक वर्षाच्या 'अबुडी' नावाच्या मुलासह मायदेशी परतण्यासाठी गेल्या वर्षभरापासून धडपड करत आहेत, परंतु कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांना प्रत्येक पावलावर मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabia
Iran US Tensions: 'आमच्या अटी मान्य करा, नाहीतर...', इराणचा अमेरिकेला 48 तासांचा अल्टीमेटम; पश्चिम आशियात महासंकट

या कठोर शिक्षेमुळे मुथोनी प्रचंड दहशतीखाली असून, आपण चाबकांचे हे फटके सहन करु शकणार नाही, अशी भीती त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली. सौदी अरेबियात विवाहबाह्य संबंध ठेवणे बेकायदेशीर मानले जाते आणि मानवाधिकार संघटनांच्या मते या कायद्याचा सर्वाधिक फटका परदेशी महिला कामगारांना बसतो. मुलाला जन्म दिल्यानंतर मुथोनी यांना त्यांच्या निवासस्थानी परत जाऊ दिले नाही, त्यामुळे त्यांना इतर अशाच पीडित मातांसोबत एका पेट्रोल पंपावर आसरा घ्यावा लागला होता. प्रसारमाध्यमांत हे प्रकरण गाजल्यानंतर त्यांना निवारा मिळाला खरा, पण खटला सुरु असेपर्यंत देश सोडण्यास बंदी घालण्यात आली.

Kenyan Woman Sentenced To 100 Lashes Saudi Arabia
US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

दरम्यान, यूकेस्थित 'ALQST' या मानवाधिकार संघटनेने या शिक्षेचा तीव्र निषेध केला. एकीकडे सौदी शासन महिला सक्षमीकरणाचा आणि आधुनिकतेचा दावा करत असताना, दुसरीकडे एका असहाय मातेला अशी अमानुष शिक्षा सुनावणे हा हिंसाचाराचाच प्रकार असल्याचे संघटनेने म्हटले. मुथोनी यांना बाजू मांडण्यासाठी साधा वकीलही मिळालेला नसून, त्यांना तात्काळ मायदेशी पाठवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.