Iran US Tensions: 'आमच्या अटी मान्य करा, नाहीतर...', इराणचा अमेरिकेला 48 तासांचा अल्टीमेटम; पश्चिम आशियात महासंकट

Abbas Araghchi Iran Foreign Minister War Warning: पश्चिम आशियातील भीषण युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला 48 तासांचा अल्टीमेटम दिला.
Abbas Araghchi Iran Foreign Minister War Warning
Abbas Araghchi Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Iran 48 Hour Ultimatum To US Strait Of Hormuz: पश्चिम आशियातील भीषण युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला 48 तासांचा अल्टीमेटम दिला. अमेरिकेने सर्व आघाड्यांवरील युद्ध तात्काळ थांबवण्याची इराणची अट मान्य केल्यास, अवघ्या दोन दिवसांत स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्त्वाचा सागरी मार्ग खुला केला जाईल, अशी मोठी घोषणा इराणने केली.

मात्र, अमेरिकेने ही अट नाकारल्यास इराणी सैन्य त्यांच्यावर अत्यंत भीषण आणि विनाशकारी हल्ला करेल, असा गंभीर इशाराही अराघची यांनी सरकारी माध्यम आणि सोशल मीडियाद्वारे दिला. अमेरिकन मतदारांनी त्यांचा कौल दिला असून आता व्हाईट हाऊसने निर्णय घ्यावा, असे सांगत इराणने स्पष्ट मुत्सद्दी आव्हान उभे केले.

Abbas Araghchi Iran Foreign Minister War Warning
US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

अमेरिकेतील (America) मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची प्रक्रिया ठप्प झाली असून, इराणने कोणत्याही लष्करी कारवाईला तोंड देण्यासाठी आपली शस्त्रे आणि सैन्य सज्ज ठेवल्याचा दावा केला. दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इराणच्या या मागण्या अत्यंत अवास्तव, हास्यास्पद आणि अमान्य असल्याचे सांगत फेटाळून लावल्या. फ्रान्समधील जी-7 परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी रुबियो यांनी स्पष्ट केले की, इराणशी तडजोड करणे सध्या तरी अशक्य दिसते. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक कोंडी आणखी गंभीर बनली असून युद्धाचे सावट गडद झाले आहे.

Abbas Araghchi Iran Foreign Minister War Warning
Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या वाढत्या तणावादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकन मीडियाशी बोलताना आपले मत मांडले आहे. जर इराणने एका मजबूत शांतता करारावर स्वाक्षरी केली, तर त्यांच्यावर पुन्हा लष्करी हल्ला करण्याची गरज भासणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, इराण हा सध्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत कमकुवत झालेला देश असून गरज पडल्यास त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ताकद अमेरिकेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्यावधी निवडणुकीतील राजकीय उलथापालथीनंतर अमेरिकेच्या भूमिकेत काही प्रमाणात मवाळपणा दिसत असला, तरी कतारच्या मध्यस्थीने पाठवलेल्या इराणच्या सात अटींवर अद्याप कोणतेही एकमत होऊ शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.