Kenya Drought: केनियात 40 वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळ, हजारो वन्यप्राणी दगावले; पाहा दुष्काळाची भयावह दृष्य

Kenya Drought
Kenya DroughtDainik Gomantak
Published on
Updated on

केनियामध्ये मागील 40 वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळ पडला आहे. देशात सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की देशातील सर्वांत मोठ्या अँबोसेली राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचे मृतदेह आढळत आहेत.

दुष्काळामुळे महाकाय हत्ती, जिराफ, झेब्रा, म्हैस, वाईल्डबीस्ट मृतावस्थेत आढळत आहेत. दररोज डझनभर प्राणी असेच दगावत आहेत.

केनियातील या दुष्काळाची ही दृष्य सध्या समोर आली असून, ही दृष्य केनियातील दुष्काळाची भीषणता स्पष्ट करत आहेत.

Kenya Drought
Bhide Guruji Notice: भिडे गुरूजींना महिला आयोगाची दुसऱ्यांदा नोटीस; उत्तर न दिल्यास कारवाई

केनियाच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, दुष्काळात आतापर्यंत 205 हत्ती, 500 वाईल्डेबीस्ट, 400 झेब्रा आणि 50 म्हशी, 12 जिराफ, पाणघोडे यासह विविध अन्य प्राणी दगावले आहेत.

मागील दहा महिन्यात दुष्काळाची भीषणता अधिक वाढली असून, फेब्रुवारी ते ऑक्टोंबर दरम्यान मृत झालेल्या प्राण्याची संख्या 1,235 एवढी आहे.

केनियातून समोर येणाऱ्या मृत प्राण्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत.

Kenya Drought
Satish Jarkiholi: 'हिंदू' हा शब्द फारसी... याचा अर्थ अत्यंत घाणेरडा; कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे वादग्रस्त विधान

नागरिक केनियातील या परिस्थितीवर हळहळ व्यक्त करत असून, सर्वांसाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, दोन वर्षे पाऊसच न झाल्याने केनियात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. यासाठी केनिया प्रशासन देखील शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.

Kenya Drought
Imran Khan: फिर होगा आगाज़! जिथे गोळी लागली तिथून पुन्हा पदयात्रा, इम्रान यांची घोषणा

केनिया प्रशासनाच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी खाद्य तसेच, चारा पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तसेच, प्राण्यांसाठी पाणी देखील उपलब्ध करून दिले जात आहे.

दरम्यान, केनियामधील दुष्काळाबाबत जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, मदतीचे आवाहन देखील केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com