Imran Khan: फिर होगा आगाज़! जिथे गोळी लागली तिथून पुन्हा पदयात्रा, इम्रान यांची घोषणा

पाकिस्तानमध्ये नव्याने सार्वत्रिक निवडणुका घेण्याची इम्रान खान मागणी करत आहेत.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर पंजाब प्रांतातील रॅलीदरम्यान हल्ला झाला. इम्रान खान यांच्यावर झाडलेली गोळी त्यांच्या पायात लागली. दरम्यान, पंजाब प्रांतातील रॅलीदरम्यान ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणाहून इस्लामाबादकडे मोर्चा पुन्हा सुरू करणार. अशी घोषणा इम्रान खान यांनी रविवारी केली. 'गुलामीचे जीवन जगण्यापेक्षा मी मृत्यूला प्राधान्य देतो', असे वक्तव्य त्यांनी केले.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) पक्षप्रमुख इम्रान खान (70) यांना गुरुवारी गोळी लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. खान यांच्यावरील उपचारानंतर ते जमान पार्क येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. इम्रान खान यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना रविवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. खान सध्या लाहोर शहरातील त्यांच्या खाजगी निवासस्थानी आहेत. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Imran Khan
Satish Jarkiholi: 'हिंदू' हा शब्द फारसी... याचा अर्थ अत्यंत घाणेरडा; कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे वादग्रस्त विधान

दरम्यान, रूग्णालयात असताना इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेतली. इम्रान खान म्हणाले, "मंगळवारी वजिराबादमधून त्याच ठिकाणाहून पुन्हा मोर्चा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याच ठिकाणी मला आणि इतर 11 जणांना गोळ्या घालण्यात आल्या, या हल्ला मोअज्जम शहीद झाला. मी लाहोरमध्ये मोर्चाला संबोधित करेन, 10 ते 14 दिवसांत मोर्चा रावळपिंडीला पोहोचेल. मोर्चा रावळपिंडीला पोहोचेल तेव्हा ते त्यात सामील होतील आणि स्वतः त्याचे नेतृत्व करतील."

दरम्यान, एप्रिलमध्ये नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाले. पाकिस्तानमध्ये नव्याने सार्वत्रिक निवडणुका घेण्याची खान मागणी करत आहेत. मात्र, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सध्या निवडणुका घेण्यास विरोध करत आहे. सध्याच्या नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ ऑगस्ट 2023 मध्ये संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com