Satish Jarkiholi: 'हिंदू' हा शब्द फारसी... याचा अर्थ अत्यंत घाणेरडा; कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे वादग्रस्त विधान

जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Satish Jarkiholi
Satish JarkiholiDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Laxmanrao Jarkiholi ) यांनी हिंदू या शब्दाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदू हा शब्द केवळ भारताचा नाही, हिंदू हा शब्द फारसी आहे. तसेच हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ आहे. असे विधान कर्नाटक काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. जारकीहोळी हे रविवारी बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी परिसरात मानव बंधुता संस्थेच्या कार्यक्रमात बोलत असताना, त्यांनी हे विधान केले आहे.

जारकीहोळी म्हणाले, "हिंदू हा शब्द कसा आला यावर वाद व्हायला हवा. हिंदू हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. इराक, इराण, कझाकस्तान, याचा भारताशी काय संबंध? जर तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थ माहित झाला तर त्याची लाज वाटेल. हिंदू या शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे. काही लोक या परकीय शब्दावर का आवाज करत आहेत, हे समजत नाही. हा परकीय शब्द आपल्यावर का लादला जातोय यावर चर्चा व्हायला हवी."

Satish Jarkiholi
Bharat Jodo Yatra: आजपासून राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रात प्रवेश

जारकीहोळी यांच्या या भाषणाशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप देखील समोर आली आहे, जी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यादरम्यान जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघात जारकीहोळी कुटुंबीय निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनीही हिंदू धर्मग्रंथ गीतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. जिहाद केवळ कुराणात नाही, तर गीतेतही जिहाद आहे, येशूमध्येही जिहाद आहे, असे ते म्हणाले होते.

शिवराज पाटील म्हणाले, "इस्लाम धर्मात जिहादची खूप चर्चा झाली आहे. आपण संसदेत जे काम करत आहोत ते जिहादचे नसून विचारांचे आहे. जेव्हा सर्व प्रयत्न करूनही पवित्र विचार कोणाला कळत नाहीत तेव्हा सत्तेचा वापर झाला पाहिजे. हे केवळ कुराण शरीफमध्ये नाही, तर महाभारतातील गीतेचाही भाग आहे, त्यातही जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनालाही जिहाद शिकवला होता."

Satish Jarkiholi
Kerala MP's Son Disrobed: केरळच्या खासदाराच्या मुलाची विमानतळावर विवस्त्र करून तपासणी

जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधला असून हा व्होट बँकेचा उद्योग असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे. तसेच, हिंदूंचा अपमान केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com