Sudan Violence: सुदानमध्ये अडकले कर्नाटकचे 31 आदिवासी, 'सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं...'

Sudan Violence: दरम्यान, हिंसाचारामुळे कर्नाटकातील 31 आदिवासी सुदानमध्ये अडकले आहेत. हे सर्व 31 आदिवासी हक्की पिक्की जमातीचे आहेत.
Sudan Crisis
Sudan CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

Sudan Power Struggle Between Army Paramilitaries: सुदानची राजधानी खार्टूममध्ये रॅपिड सपोर्ट फोर्स आणि देशाच्या लष्करामध्ये अनेक दिवसांच्या तणावानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली आहे.

देशभरात सातत्याने गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाजवळ गेल्या अनेक तासांपासून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

सुदानीज डॉक्टर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 183 लोक जखमी झाले आहेत. यातच, सुदानमधील सत्तासंघार्षादरम्यान एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

दरम्यान, हिंसाचारामुळे कर्नाटकातील (Karnataka) 31 आदिवासी सुदानमध्ये अडकले आहेत. हे सर्व 31 आदिवासी हक्की पिक्की जमातीचे आहेत. आदिवासींची अवस्था अत्यंत वाईट आहे. गेल्या आठवड्यात उशिरा सुरु झालेल्या हिंसक चकमकींमुळे आदिवासींकडे खाण्यापिण्याच्या वस्तूही संपल्याचं बोललं जात आहे.

Sudan Crisis
Sudan Crisis: लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये सत्ता संघर्ष, 30 ठार, 400 जण जखमी; भारतीयांसाठी...

कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) सुदानमध्ये फसलेल्या आदिवासींच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. अडकलेल्या लोकांनी बाहेर पडू नये आणि भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. मनोज राजन यांनी सांगितले की, 'कर्नाटकातील 31 लोकांचा समूह सुदानमध्ये (Sudan) अडकल्याचे आम्हाला समजले आहे. याबाबत आम्ही परराष्ट्र मंत्रालयाला कळवले आहे.

आम्ही समूहाला सुदानमधील भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. अडकलेल्या लोकांनी सुदानमधील भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून त्यावर काम सुरु आहे.'

Sudan Crisis
Sudan Crisis: अब्दुल्ला हमडोक पुन्हा एकदा येणार सत्तेवर, लष्कराशी झाली सहमती

काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर काँग्रेसने निशाणा साधला आहे.

काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारला कन्नडिगविरोधी ठरवून सुदानमध्ये अडकलेल्या कर्नाटकी आदिवासींच्या सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप केला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र आणि कर्नाटक सरकारवर निशाणा साधला.

सुरजेवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, हकी पिक्की जमातीतील 31 लोक सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अडकून पडले आहेत.

कन्नडविरोधी मोदी सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्याऐवजी त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी सोडले आहे. प्रल्हाद जोशी आणि शोभा करंदलाजे कुठे आहेत?

Sudan Crisis
Sudan Crisis: सुदानमधील संघर्षांदरम्यान एका भारतीयाचा मृत्यू!

सिद्धरामय्यांचं पीएम मोदी आणि सीएम बोम्मई यांना आवाहन

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी आणि बोम्मई यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन त्यांचे सुरक्षित परत येणे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. आदिवासींना घरी परत आणण्यासाठी सरकारने अद्याप कार्यवाही सुरु केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com