Pakistan Political Crisis: इम्रान खान यांच्या घरातून 14 दहशतवाद्यांना अटक; शाहबाज सरकारचा दावा

लाहोरमधील जमान पार्कमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या घराबाहेर 400 पोलिसांची तुकडी शोध मोहिमेसाठी दाखल झाली आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Imran khan Pakistan Political Crisis: पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मागचे ग्रहन काही संपण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी लाहोर पोलिसांनी खान यांच्या घरातून आणखी सहा दहशतवाद्यांना अटक केलीय.

दरम्यान, पुन्हा खान यांच्या घराचा शोध घेतला जाणार आहे. लाहोरमधील जमान पार्कमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या घराबाहेर 400 पोलिसांची तुकडी शोध मोहिमेसाठी दाखल झाली आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहोर कॅपिटल सिटी पोलिस अधिकारी बिलाल साद्दिक कामयान यांनी सांगितले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जमान पार्क निवासस्थानातून पळून गेलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बिलाल कामयान पुढे म्हणाले की, या सहा दहशतवाद्यांच्या अटकेमुळे आतापर्यंत जमान पार्कमधून एकूण 14 दहशतवाद्यांना अटक झाली आहे.

पाकिस्तानी पंजाब पोलीस खान यांच्या घरात लपलेल्या कथित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा अभियान सुरू करणार आहेत. राज्य सरकारने खानला दहशतवाद्यांच्या ताब्यात देण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती, ती आता संपली आहे.

पाकिस्तानी मीडियाच्या मते, पंजाबच्या अंतरिम सरकारने बुधवारी दावा केला की इम्रान खान यांच्या जमान पार्कमधील निवासस्थानी 30-14 दहशतवादी लपले आहेत, ज्यांना सरकारने ताब्यात देण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला होता.

Imran Khan
Chhattisgarh: अनुकंपा नियुक्तीसाठी आई-वडिल आणि आजीची हत्या; सॅनिटायझर टाकून जाळले मृतदेह

पाकिस्तानी मीडियानुसार, जमान पार्ककडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांच्या प्रमुखांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या एक वर्षापासून पीटीआयला उद्धवस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण पीटीआय त्याच्या चालीमुळे कमकुवत होणार नाही तर बळकट होईल. असे इम्रान खान म्हणाले होते.

पाकिस्तान सरकार सतत त्यांचा पक्ष उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. लंडनमध्ये जेव्हापासून ही योजना बनवली गेली तेव्हापासून मी आणि माझ्या पक्षाच्या मागे असल्याचे खान म्हणाले होते. मला अटक करा आणि मला संपवायचे आहे. पीटीआयवर बंदी घालायची आहे. सरकारने पाकिस्तानला ज्या विनाशाच्या मार्गावर आणले आहे, त्यातून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकाच देशाला सुरक्षितपणे बाहेर काढू शकतात.

Imran Khan
डॉक्टरच्या घरातून मोलकरणीने एक-एक दागिना केला चोरी, व्हॉट्सॲप DP मुळे उघड झाला प्रकार

पाकिस्तानी संसदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ या वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. निवडणूक आयोग ऑक्टोबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. खान यांनी 9 मेच्या दंगलीच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारामागे एक कट होता असा आरोप खान यांनी केलाय. सर्व काही आधीच ठरले होते असेही खान यांनी म्हटलंय, प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

लाहोरमधील जमान पार्कमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या घराबाहेर 400 पोलिसांची तुकडी शोध मोहिमेसाठी दाखल झाली आहे. पंजाब पोलिसांना या शोध मोहिमेसाठी न्यायालयाकडून वॉरंट मिळाले आहे. काही वेळात कारवाई सुरू होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com