Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Jeffrey Epstein Files Photos: कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्सटीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आले.
Donald Trump Photos
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Jeffrey Epstein Files Photos: कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्सटीनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आले. अमेरिकन संसदेच्या 'हाउस ओवरसाइट कमिटी'मधील डेमोक्रॅटिक खासदारांनी एप्सटीनच्या मालमत्तेतून जप्त केलेले 68 नवीन फोटो सार्वजनिक केले. ही माहिती अशा वेळी समोर आली, जेव्हा अमेरिकन कायद्यानुसार न्याय विभागाला आपल्या तपासाशी संबंधित अनक्लासिफाइड फाइल्स अधिकृतरित्या प्रसिद्ध करायच्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोंमधील मजकूर अत्यंत अस्वस्थ करणारा असून यामुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे फोटोंमधील 'लोलिता' कनेक्शन?

प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये काही महिलांच्या शरीरावर काळ्या शाईने 'लोलिता' या वादग्रस्त पुस्तकातील ओळी लिहिलेल्या दिसत आहेत. हे पुस्तक एका 12 वर्षांच्या मुलीबद्दलच्या विकृत आकर्षणावर आधारित आहे. महिलांच्या (Women) शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर या ओळी लिहिणे हे एप्सटीनच्या क्रूर मानसिकतेचे दर्शन घडवते. याशिवाय रशिया, मोरक्को, इटली, झेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि लिथुआनिया यांसारख्या देशांतील तरुणींची ओळखपत्रेही (पासपोर्ट) या फोटोंमध्ये दिसून आली आहेत. जरी त्यांवरील नावे लपवण्यात आली असली, तरी यावरुन एप्सटीनचे मानवी तस्करीचे जाळे जगभर पसरले होते, हे स्पष्ट होते.

Donald Trump Photos
Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

तरुणींची बोली आणि 1 हजार डॉलर्सचे चॅट

या फोटोंच्या संग्रहात काही जुन्या 'टेक्स्ट चॅट'चे स्क्रीनशॉट्स देखील आहेत. एका चॅटमध्ये "मी आता मुली पाठवत आहे," असा उल्लेख आहे. यामध्ये एका रशियन मुलीची किंमत 1000 डॉलर्स इतकी सांगितल्याचे दिसत आहे. या चॅटमध्ये किशोरवयीन मुलींशी संबंधित माहिती देखील आहे. हे मेसेज नेमके कोणाला पाठवले गेले, याचा तपास अजूनही सुरु आहे. एकूण 95000 फोटोंपैकी हे 68 फोटो पारदर्शकतेच्या नावाखाली खासदारांनी जनतेसमोर आणले आहेत.

Donald Trump Photos
Donald Trump Dance: मलेशियात उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका! सोशल मीडियावर 'तो' भन्नाट डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का? VIDEO

बड्या हस्तींचे फोटो आणि राजकीय वाद

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या 19 फोटोंमध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचेही काही फोटो होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले होते की, "एप्सटीनसोबत सर्वांचेच फोटो आहेत, त्यात काही विशेष नाही." मात्र, आता समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, प्रख्यात विचारवंत नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनॉन दिसत आहेत. डेमोक्रॅट खासदारांनी स्पष्ट केले की, फोटोंमध्ये कोणाचे नाव असणे म्हणजे तो गुन्हेगार आहे असे नाही, तर ही केवळ माहिती सार्वजनिक करण्याची प्रक्रिया आहे.

'एप्सटीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट' आणि अंतिम मुदत

जेफ्री एप्सटीन हा अब्जाधीश असूनही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात होता. 2019 मध्ये त्याने तुरुंगातच आत्महत्या केली (काही लोक याला हत्या मानतात). 2024 मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार 950 पानांची कागदपत्रे उघड झाल्यानंतर यात बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू आणि डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या नावांचा उल्लेख आला होता.

Donald Trump Photos
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

2025 मध्ये अमेरिकन काँग्रेसने 'एप्सटीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट' मंजूर केला. या कायद्यानुसार, न्याय विभागाला 19 डिसेंबर 2025 पर्यंत (म्हणजे आजच) सर्व सरकारी दस्तऐवज सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. जगभरातील लोक एका अशा 'क्लायंट लिस्ट'ची प्रतीक्षा करत आहेत, ज्यामध्ये एप्सटीनच्या गुन्हेगारी जाळ्यातील ग्राहकांची नावे असतील. मात्र, एफबीआयने (FBI) अद्याप अशा कोणत्याही अधिकृत यादीचे अस्तित्व मान्य केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com