अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Iran US Conflict Impact on Japan Economy: मध्यपूर्वेतील या अस्थिरतेमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जपानचा व्यापार तोटा तब्बल 1700 अब्ज येन वर पोहोचला.
Iran US Conflict Impact on Japan Economy
Iran US Conflict Impact on Japan EconomyDainik Gomantak
Published on
Updated on

Iran US Conflict Impact on Japan Economy: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित न राहता, जगातील प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या जपानवरही उमटू लागले आहेत. मध्यपूर्वेतील या अस्थिरतेमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जपानचा व्यापार तोटा तब्बल 1700 अब्ज येन वर पोहोचला.

जपान सरकारने बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, सलग पाचव्या वर्षी देशाला व्यापार तुटीचा सामना करावा लागत आहे. या तणावाचा परिणाम केवळ तुटीवरच नाही, तर जपानच्या आयात-निर्यात साखळीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत निर्यातीत 4 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी आयातीमध्ये मात्र केवळ 0.5 टक्क्यांची नगण्य वाढ नोंदवण्यात आली आहे.

Iran US Conflict Impact on Japan Economy
US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

जपानच्या (Japan) या आर्थिक अडचणींमागे केवळ मध्यपूर्वेतील युद्धच नाही, तर अमेरिकेची व्यापारी धोरणेही कारणीभूत ठरली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि इतर देशांतून होणाऱ्या आयातीवर लादलेल्या उच्च सीमाशुल्कामुळे जागतिक वाहन उत्पादक आणि इतर उद्योगांना मोठा धक्का बसला आहे.

आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात जपानची अमेरिकेला होणारी एकूण निर्यात 6.6 टक्क्यांनी घटली, तर वाहन क्षेत्रातील निर्यातीत 16 टक्क्यांची मोठी घसरण झाली. मात्र, मार्च महिन्यात जपानच्या व्यापार शिलकीत 26 टक्क्यांनी वाढ झाली, जे निर्यातीचे क्षेत्र पूर्वीच्या धक्क्यातून सावरत असल्याचे एक सकारात्मक संकेत मानले जात आहेत. मार्चमध्ये निर्यात 11.7 टक्क्यांनी तर आयात 10.9 टक्क्यांनी वाढली.

Iran US Conflict Impact on Japan Economy
Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

अमेरिकेच्या (America) टॅरिफच्या माऱ्यातून जपान सावरत असतानाच इराण युद्धाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. पश्चिम आशियातून होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याच्या भीतीने जपानच्या चिंतेत भर घातली. जपान आपल्या तेल आणि वायूच्या गरजांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. ऊर्जेव्यतिरिक्त, तेलाच्या कमतरतेमुळे 'नॅफ्था' आधारित उत्पादनांच्या निर्मितीवरही परिणाम होऊ शकतो, जे वैद्यकीय साहित्य आणि प्लास्टिक उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Iran US Conflict Impact on Japan Economy
US Iran War: ट्रम्प यांचा इराणला थेट 'चेकमेट'! अमेरिकन नौदलाकडून बंदरांची नाकेबंदी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचे ढग दाटले

या गंभीर परिस्थितीतही जपान सरकारने आपल्या जनतेला धीर दिला. कोणत्याही आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी जपानकडे 254 दिवसांचा तेल साठा उपलब्ध आहे. पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकार या राखीव साठ्यातून मदत करु शकते. याशिवाय, आशियातील तेल आणि वायू पुरवठ्याचा मुख्य मार्ग असलेल्या 'होर्मुझच्या समुद्रधुनी'ला पर्याय शोधण्यासाठी जपानने आता वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत, जेणेकरुन भविष्यातील ऊर्जा संकट टाळता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com