Ecuador Presidential Candidate Fernando Villavicencio Shot Dead:
इक्वेडोरचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो व्हिलाव्हिसेन्सियो यांची बुधवारी संध्याकाळी राजधानी क्विटोमध्ये सभेनंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
59 वर्षीय पत्रकार विलाव्हिसेन्सिओ हे 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या आठ उमेदवारांपैकी एक होते.
निवडणुकीला (Presidential Election) दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी असताना क्विटोमध्ये (Quito) राजकीय सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, बंदुकधारींनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
डेप्युटी कमांडर जनरल मॅन्युएल इनिगेझ (General Manuel Iniguez) यांनी सांगितले की, विलाव्हिसेन्सियो क्विटो (Quito) येथील हायस्कूलमधून सभा संपल्यानंतर जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
विलाव्हिसेन्सियो यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू झाल्याचे जाहिर केले. याशिवाय, हल्ल्यात एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे.
एका उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, बंदूकधाऱ्यांनी (Gunners) यावेळी विलाव्हिसेन्सियो यांच्या समर्थकांवर बॉम्ब (Grenade) फेकले. मात्र, त्याचा स्फोट झाला नाही.
इक्वेडोरचे राष्ट्रपती गिलेर्मो लासो म्हणाले की, मारेकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
विशेष म्हणजे इक्वेडोरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी (Smuggling Of Drugs) नियंत्रणाबाहेर गेली आहे.
गेल्या महिन्यात, इक्वाडोरचे राष्ट्रपती गिलेर्मो लासो (Guillermo Lasso) यांनी संघटित गुन्हेगारीशी निगडीत हत्यांच्या मालिकेनंतर तीन प्रांतांमध्ये आणीबाणी आणि रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली.
सुरक्षेबरोबरच, विलाव्हिसेन्सिओ यांनी आपल्या सभेत भ्रष्टाचारावर (Corruption) जोरदार टीका केली होती. पत्रकार म्हणून त्यांनी हा मुद्दा मांडला. याशिवाय पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यावरही त्यांचा पूर्ण भर होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.