इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांची घेतली भेट

अब्बास (Mahmoud Abbas) आणि इस्रायली नेत्यांमधील संवाद इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या राजवटीत जवळजवळ पूर्णपणे थांबला होता.
Israeli Defense Minister
Israeli Defense MinisterDainik Gomantak
Published on
Updated on

इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री बेनी गॅन्ट्झ (Israeli Defense Minister) यांनी रविवारी रात्री पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास (Palestinian President Mahmoud Abbas) यांची भेट घेतली. वर्षांमध्ये दोन्ही पक्षांमधील ही पहिली उच्चस्तरीय चर्चा होती. अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती दिली. अब्बास आणि इस्रायली नेत्यांमधील संवाद इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या राजवटीत जवळजवळ पूर्णपणे थांबला होता. अशा परिस्थितीत, गॅन्ट्झ आणि अब्बास यांच्यातील संभाषणाकडे दृष्टिकोन बदलण्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

Israeli Defense Minister
'पाकिस्तानच तालिबानचा जन्मदाता', भारताला रोखण्यासाठीच स्थापना - अफगाणी राजदूत

नेतान्याहू यांच्याकडे पॅलेस्टाईनबाबत कट्टर धोरणाचे पालन करणारे नेते म्हणून पाहिले जाते. त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा होता. ट्रम्प यांनी इस्रायलमधील अमेरिकेचे दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेममध्ये हलवण्यासारख्या इस्रायल समर्थक धोरणांना मंजुरी दिली होती. त्या वर्षांमध्ये अब्बास यांनी अमेरिका आणि इस्रायलशी चर्चा थांबवली होती.

Israeli Defense Minister
तालिबानचा नवा फर्मान जारी, अफूच्या लागवडीवर आणली बंदी

द हारेत्झ दैनिक वृत्तपत्राने असे वृत्त दिले की, ही बैठक इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पश्चिम किनारपट्टीतील रामल्ला येथे झाली, जिथे अब्बास प्रशासनाचे मुख्यालय आहे. गॅन्ट्झ यांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गॅन्टझने अब्बास यांना सांगितले की इस्रायल पॅलेस्टिनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावले उचलेल. पश्चिम किनारपट्टीतील अब्बास प्रशासित स्वायत्त प्रदेशांची अर्थव्यवस्था इस्राईलवर अवलंबून आहे. इस्रायलने सुरक्षेचे कारण सांगून अनेक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे पॅलेस्टिनी प्रदेशाची अर्थव्यवस्थेला दिवाळखोरीची अवस्था प्राप्त झाली आहे. अब्बास यांचे निकटवर्तीय हुसेन शेख यांनी ट्विटरद्वारे बैठकीची पुष्टी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com