तालिबानचा नवा फर्मान जारी, अफूच्या लागवडीवर आणली बंदी

कंधार (Kandahar) आणि आसपासच्या भागात सर्वाधिक अफूची लागवड केली जात असून जिथे आता शेतकऱ्यांना ते बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
Opium
OpiumDainik Gomantak

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) स्वतःचे सरकार बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तालिबान देशात अनेक बदल आणत असून त्याबद्दल अफगाणी लोकांना माहिती दिली जाऊ लागली आहे. यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून आता अफगाणिस्तानमध्ये अफूच्या (Opium) लागवडीवर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना सांगितले आहे की, त्यांनी यापुढे अफूची लागवड करु नये, कारण देशात त्यावर बंदी घालण्यात येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनुसार, कंधार आणि आसपासच्या भागात सर्वाधिक अफूची लागवड केली जात असून जिथे आता शेतकऱ्यांना ते बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

तालिबानच्या या हुकुमाचा परिणाम दिसू लागला आहे, अफगाणच्या बाजारात अफूचे दर वाढले आहेत. कारण लोकांना माहित आहे की अफूचे भविष्य निश्चित नाही. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Jabiullah Mujahid) यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले होते की तालिबानच्या राजवटीत ड्रग्संना परवानगी दिली जाणार नाही.

Opium
"भारत-पाकिस्तान सीमेवर लढा,आम्हाला दूर ठेवा'' तालिबानचं मोठं वक्तव्य

अफूची किंमत 200 डॉलर प्रति किलोपर्यंत पोहोचली

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानच्या या आदेशानंतर अफूची किंमत थेट $ 70 प्रति किलो वरून $ 200 प्रति किलो झाली आहे. तालिबानचा हा निर्णय देखील आश्चर्यकारक असून कारण बऱ्याच काळापासून तो स्वतः या व्यवसायाचा सर्वात मोठा भागधारक आहे. अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अफूची लागवड तालिबानने केली होती, जे तालिबानच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत होता.

Opium
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयार सापडले

तालिबानच्या या निर्णयामुळे लोक संतापले

तालिबानच्या या नव्या निर्णयाबद्दल लोक संतापले आहेत. परंतु त्यांच्यासमोर कोणताही प्रकारचा मार्ग नाही. अमेरिकेने बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानात अफूची लागवड कमी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नव्हता. अफगाणिस्तानातून जगातील इतर अनेक देशांना मोठ्या प्रमाणात अफूचा पुरवठा केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com