'पाकिस्तानच तालिबानचा जन्मदाता', भारताला रोखण्यासाठीच स्थापना - अफगाणी राजदूत

अफगाणिस्तानचे माजी राजदूत महमूद सैकल यांनी पाकिस्तानला (Pakistan) तालिबानचा (Taliban) जनक म्हटले आहे
Pakistan formed the Taliban to thwart India
Pakistan formed the Taliban to thwart IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेले पाकिस्तान (Pakistan) स्वतःला हवे तेवढे सभ्य म्हणून सिद्ध करत आहे, परंतु हळूहळू त्याचा चेहरा जगासमोर उघड होतच असतो. आता अफगाणिस्तानचे माजी राजदूत महमूद सैकल यांनी पाकिस्तानला तालिबानचा (Taliban) जनक म्हटले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तनचा खरा चेहरा उघडा होत आहे. ( Pakistan formed the Taliban to thwart India)

इम्रान खान यांना असे वाटते की बेड्या मोडल्या आहेत-

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचा हवाला देत त्यांनी ट्विट केले की, भारताला रोखण्यासाठीच पाकिस्तानने तालिबानला जन्म दिला.महमूद सैकल हे अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी उप -परराष्ट्र मंत्री आणि संयुक्त राष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामध्ये अफगाणिस्तानचे राजदूत आहेत.

परवेझ मुशर्रफ यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने भारताला रोखण्यासाठी तालिबानला जन्म दिला होता. इम्रान खान यांना (Imran Khan) वाटते की तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली आहे आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि एनएसए मोईद युसुफ तालिबान्यांना जगासमोर लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.अशी टीकाही त्यांनी पाकिस्तनवर केली आहे.

Pakistan formed the Taliban to thwart India
Kabul Airport वर पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची शक्यता- जो बायडेन

अफगाणिस्तानच्या बाजूने केवळ दबाव आणलेले धोरण आणि सशर्त संबंध सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पुनर्संचयित करू शकतात. त्यांनी असेही लिहिले की अमेरिकेच्या अहवालानुसार, ISIS -K, तालिबान आणि अल कायदा यांच्यात संबंध आहेत.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर अल कायदाचे अड्डे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अल-कायदाचे प्रमुख नेते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानशी जोडलेल्या सीमावर्ती भागात राहत आहेत. अल कायदा या दहशतवादी संघटनेचे लढवय्ये मोठ्या संख्येने तालिबानशी संबंधित आहेत आणि ते अफगाणिस्तानच्या अनेक भागात राहत आहेत. या अहवालात असेही म्हटले आहे की, अल कायदाचा म्होरक्या आयमन मोहम्मद रबी अल-जवाहिरीचा मृत्यू गेल्या काही वर्षांत झाला होता, परंतु याची पुष्टी झाली नाही. हा दहशतवादी सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमा भागात राहत आहे.

अल कायदा तालिबानच्या छत्राखाली कंधार, हेलमंद निमरुझ प्रांतातून कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.तर त्यांचा सध्याचा नेता ओसामा महमूद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com