Israel-Hamas War: ‘’तु माझ्याशी लग्न कर आणि...’’; 18 वर्षीय इस्त्रायली तरुणीला हमासच्या दहशतवाद्याने दिली होती प्रेमाची कबुली

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे.
Israeli Hostage
Israeli Hostage Dainik Gomantak

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. युद्धादरम्यान एक प्रेम कहाणी समोर आली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या 238 इस्रायलींपैकी एक 18 वर्षीय नोगा वीस एक होती. 18 वर्षीय नोगा सांगते की, हमासच्या एका दहशतवाद्याला तिच्याशी लग्न करायचे होते. नोगाने प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'त्याने 14 व्या दिवशी मला अंगठी दिली होती'.

दरम्यान, हमासच्या ताब्यात असलेल्या नोगाने हा खुलासा केला आहे. नोगाने पुढे सांगितले की, ज्या दहशतवाद्याने तिला ओलीस ठेवले होते त्याने तिला अंगठी दिली होती आणि सांगितले होते की तो तिच्याशी लग्न करेल. नोगाच्या म्हणण्यानुसार, हमासच्या दहशतवाद्याने तिला आपल्याजवळ ठेवले होते. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे की, नोगा गाझा पट्टीमध्ये दोन आठवड्यांपासून हमासच्या बंदिववासात होती. यावेळी तिच्या अपहरणकर्त्यांपैकी एकाने तिच्यावर प्रेम जडल्याची कबुली दिली होती. त्यासाठी त्याने तिला पटवले. ती त्याच्यासोबत 50 दिवस रिलेशनशिपमध्ये होती.

Israeli Hostage
Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

नोगा दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्याने तिला सांगितले होते की, काही दिवसांत सर्वांची सुटका होईल, पण तु इथे माझ्यासोबत राहशील आणि माझ्या मुलांना जन्म देशील. 50 दिवस अपहरणकर्त्यासोबत घालवल्यानंतर नोगाला वेगळ्या ठिकाणी हालवण्यात आले. या 50 दिवसांदरम्यान अपहरणकर्त्यांनी नोगाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.

Israeli Hostage
Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, नोगाने चॅनल 12 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला हिजाब परिधान करायला लावले जात. तिला अपहरणकर्त्याचा हात पकडून येण्यास सांगितले जात, जेणेकरुन ते विवाहित जोडप्यासारखे दिसतील. नागोने पुढे सांगितले की, "त्यांनी आमच्यासाठी खेळण्यासाठी पत्ते आणले होते. मी स्वतःला सांगतील होते की, जोपर्यंत ते माझी हत्या करत नाहीत तोपर्यंत ते जे सांगतील ते मी करेन. ते त्यांचा मूड बदलला की पटकन एकत्र खेळायचे आणि मोठ-मोठ्याने हसायचे. ते इस्रायलवर आपला हक्क सांगायचे, ते मला कधीही गोळ्या घालतील या भीतीने मी त्यांच्या बंदिवासात जगत होते.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com