Israel Army
Israel ArmyDainik Gomantak

Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

Israel PM Benjamin Netanyahu इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, अशी शपथ घेतली आहे.
Published on

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, अशी शपथ घेतली आहे. इस्त्रायल (Israel) सातत्याने गाझावर हवाई हल्ले (Air Strikes) करत आहे. इस्त्रायली हल्ल्यात निरपराध लोकांचा बळी जात असल्याच्या तक्रारी अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी केल्या. परंतु इस्त्रायलला याचा काही एक फरक पडला नाही.

एकीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court) बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यासह अनेक इस्रायली अधिकाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायली लष्कराच्या पाच बटालियनने क्रूरतेची हद्द ओलांडल्याचा दावा अमेरिकेने (America) केला. त्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. तथापि, अमेरिकेने पुढे म्हटले की, हे गाझावरील हल्ल्याच्या खूप आधीचे आहे. आयडीएफच्या पाचपैकी चार युनिट्सनी स्वतःमध्ये सुधारणाही केली आहे.

दरम्यान, अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी सोमवारी पत्रकारांना माहिती दिली की, इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरु होण्यापूर्वी गाझा बाहेरील घटनांमध्ये मानवी हक्कांचे घोर उल्लंघन झाले आहे. ज्यासाठी इस्रायली लष्कराच्या पाच बटालियन जबाबदार आहेत. पटेल पुढे म्हणाले की, आयडीएफच्या पाचपैकी चार युनिट्सनी स्वतःमध्ये सुधारणा केली आहे.

Israel Army
Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

शस्त्रांच्या पुरवठ्यावर परिणाम होईल का?

मात्र, इस्रायली लष्कराबाबत या तक्रारी असूनही अमेरिकन शस्त्रविक्रीवर कोणताही परिणाम होणार नसून आम्ही इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरुच ठेवणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात कोणत्या संस्थांचा सहभाग होता याबद्दल अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. गेल्या महिन्यात बायडन सरकारने इस्रायली बटालियन नेत्झा येहुदावर बंदी घालण्याविषयी चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी या बटालियनवर रफाह शहरात निरपराध पॅलेस्टिनींवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला.

Israel Army
Israel Hamas War: ''आम्ही युद्धविरामासाठी तयार आहोत, पण...''; हमासच्या लीडरने इस्त्रायलसमोर ठेवली ही अट

दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. सर्वप्रथम हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हवाई हल्ले करुन 1200 लोक मारले. याशिवाय, 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. हमासकडे अजूनही 100 हून अधिक इस्रायली कैदेत आहेत. दुसरीकडे, इस्त्रायली लष्कर गाझा आणि रफाहमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी आणि तेथील लोकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवत आहे. यामध्ये 34 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com