Israel-Hamas War: प्लॅन ठरला! इस्रायल अख्खं गाझा ताब्यात घेणार; कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत ठराव संमत

Israel Gaza Takeover Plan: इस्त्रायलने गाझा ताब्यात घेण्याचा मोठा प्लॅन बनवला आहे. इस्रायली कॅबिनेटने गाझामध्ये लष्करी कारवाई तीव्र करण्यास मान्यता दिल्याचे दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.
Israel Gaza Takeover Plan
Israel PM Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा भडका आणखीनच वाढत चालला आहे. इस्त्रायलने हमासला समूळ नष्ट करण्याचा चंगच बांधला आहे. यातच आता, इस्त्रायलने गाझा ताब्यात घेण्याचा मोठा प्लॅन बनवला आहे. इस्रायली कॅबिनेटने गाझामध्ये लष्करी कारवाई तीव्र करण्यास मान्यता दिल्याचे दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.

गाझा ताब्यात घेण्याचा प्लॅन

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलचा (Israel) प्लॅन गाझा ताब्यात घेण्याचा आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कॅबिनेटने सोमवार (5 मे) सकाळी या निर्णयास मान्यता दिली, असे अधिकाऱ्यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितले.

Israel Gaza Takeover Plan
Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!

दरम्यान, मे महिन्याच्या मध्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाला भेट देणार असताना नेतन्याहू यांच्या कॅबिनेटने या प्लॅनला मंजूरी दिली आहे. असे म्हटले जात आहे की, ट्रम्प त्यांच्या मध्य पूर्व दौऱ्यात इस्रायलला भेट देणार नाहीत, परंतु ते अरब नेत्यांना नक्कीच भेटतील. या बैठकीत इस्रायल-हमास (Hamas) यांच्यात सुरु असलेल्या युद्धासंबंधी चर्चा होऊ शकते.

गाझावर इस्रायलचे हवाई हल्ले सुरुच

दुसरीकडे, इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच आहेत, ज्यामध्ये दररोज डझनभर लोक मारले जात आहेत. गाझा सिव्हिल डिफेन्सकडून सांगण्यात आले की, इस्रायली हल्ल्यात गाझामधील तीन अपार्टमेंटना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. बेत लाहिया येथेही चार जणांचा मृत्यू झाला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, युद्ध सुरु झाल्यापासून इस्रायली हल्ल्यांमध्ये 52,534 लोक मारले गेले असून 1,18,491 लोक जखमी झाले आहेत.

Israel Gaza Takeover Plan
Israel Hamas War: ‘30 दिवसांत राफाहमधून हमासच्या खुणा पुसून टाका’, नेतन्याहू यांचा इस्त्रायली लष्कराला आदेश

याशिवाय, इस्रायलने मार्चच्या सुरुवातीपासून गाझामधील 20 लाख लोकांना अन्न आणि औषधांसारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला आहे, जेणेकरुन ओलिसांच्या सुटकेसाठी हमासवर दबाव निर्माण करता येईल. या नाकेबंदीमुळे 23 लाख लोकसंख्येचा हा प्रदेश युद्धातील सर्वात वाईट मानवतावादी संकटात सापडला आहे. उपासमार सर्वत्र पसरली असून टंचाईमुळे लूटमारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

Israel Gaza Takeover Plan
Israel Hamas War: इस्त्रायलचा गाझामध्ये मोठा हल्ला; निष्पाप मुलांसह 17 जण ठार; निर्वासितांच्या छावणीला केलं लक्ष्य

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केला तेव्हा ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलने गाझामध्ये कारवाई सुरु केली. हमासकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 1,200 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 250 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले.

प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने गाझावर जलद हल्ले सुरु केले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुले मारली गेली. एवढचं नाहीतर इस्रायलने गाझाची नाकेबंदी केली, ज्यामुळे तिथे मानवतावादी मदत पोहोचवणे अत्यंत कठीण झाले. काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूंकडून युद्धबंदी झाली, पण युद्ध थांबण्याऐवजी ते वाढतच गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com