Israel Hamas War: ‘30 दिवसांत राफाहमधून हमासच्या खुणा पुसून टाका’, नेतन्याहू यांचा इस्त्रायली लष्कराला आदेश

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझाशासित शहरांवर हल्ले करत आहे.
Benjamin Netanyahu
Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझाशासित शहरांवर हल्ले करत आहे. दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललेल्या या युद्धात पुन्हा एकदा निष्पापांच्या कत्तलीचा धोका निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायली सैन्याने गाझामध्ये जे केले होते त्याचीच आता राफाहमध्ये पुनरावृत्ती होत आहे.

इस्त्रायली सैन्याने पहिल्यांदा निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो लोक मारले गेले. त्यानंतर बकरी ईदच्या दिवशी हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. नेतन्याहू यांनी इस्रायली सैन्य IDF ला राफाहमधून हमासचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. नेतन्याहू यांच्या आदेशानंतर राफाहवर नवे संकट उभे राहिले आहे.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: इस्त्रायलचा गाझामध्ये मोठा हल्ला; निष्पाप मुलांसह 17 जण ठार; निर्वासितांच्या छावणीला केलं लक्ष्य

दरम्यान, इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून सुरु झालेले युद्ध संपत नाहीये. एकीकडे जगातील सर्व देश इस्रायलकडे युद्ध थांबवण्यासाठी आग्रह धरत आहेत तर दुसरीकडे, मात्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिक आक्रमकपणे गाझावर हल्ले करत आहेत.

हमासचा जोपर्यंत संपूर्णपणे नाश होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी शपथ नेतन्याहू यांनी घेतली आहे. इस्रायलचे प्राधान्य केवळ हमासला संपवणे एवढेच नाही तर हमासच्या तावडीतून इस्त्रायली ओलिसांची सुटका करणे आहे. यासाठी इस्रायली लष्कर नव्या रणनीतीनुसार राफाहमध्ये युद्ध सुरु ठेवत आहे.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: गाझातील निर्वासितांच्या छावणीवर इस्रायलचा मोठा हल्ला; 94 पॅलेस्टिनी ठार, 200 हून अधिक जखमी

टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे की, नेतन्याहू यांनी आपल्या सैन्याला राफाहमधील हमासचा खात्मा करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. इस्रायली लष्कराने गाझाप्रमाणेच राफाहमधील हमासच्या ठिकाणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आयडीएफ कर्नल बेटिटो यांनी सांगितले की, हमासचे दहशतवादी आता आमच्या सापळ्यात अडकत चालले आहेत.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: ‘’7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा...’’; ‘ऑल आइज ऑन राफाह’ मोहिमेवर भडकला इस्त्रायल

गेल्या आठवड्यात अशाच एका घटनेत हमास ब्रिगेडच्या टोही युनिटमधील पाच जणांचा मृत्यू झाला होता. इस्त्रायली लष्कराने येथील प्रत्येक घराला लक्ष्य करत स्फोट घडवून आणले होते. आयडीएफचे म्हणणे आहे की, हमासच्या ब्रिगेडला उत्तर गाझासह इतर भागातून हाकलून देण्यात आले आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राफाहमध्ये ऑपरेशन सुरु केल्यापासून शहरात फक्त 2,000 हमासचे दहशतवादी (Terrorist) उरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com