Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांना लक्ष्य करत आहे.
Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!
Israel-Hamas WarDainik Gomantak

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांना लक्ष्य करत आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यावर हे युद्ध सुरु झाले. इस्रायलनेही हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

तसेच, इस्त्रायल आणि हमासने एकमेकांच्या नागरिकांना डांबून ठेवले. याचदरम्यान आता, एक मोठी बातमी समोर आल आहे. इस्रायलने 55 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केल्याची माहिती आहे.

पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलने ओलीस ठेवलेल्या 55 पॅलेस्टिनींची सुटका केली आहे, गाझाच्या अल-शिफा रुग्णालयाचे संचालकही कैद्यांमध्ये सामील आहेत.

रुग्णालयाच्या संचालकांनाही सोडण्यात आले

गाझाच्या अल-शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांना इस्रायलने नोव्हेंबरमध्ये अल-शिफा रुग्णालयावर छापा टाकला तेव्हा त्यांना ताब्यात घेतले होते. रुग्णालयाचेवर छापा टाकण्याचे कारण स्पष्ट करताना इस्रायली लष्कराने त्यावेळी सांगितले होते की, रुग्णालयाचा वापर हमास करत असल्याचा अंदाज होता. एवढेच नाहीतर हमास (Hamas) रुग्णालयाखाली बोगदा बांधत होता. मात्र, अबू सेलमिया आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!
Israel Hamas War: इस्त्रायलचा गाझामध्ये मोठा हल्ला; निष्पाप मुलांसह 17 जण ठार; निर्वासितांच्या छावणीला केलं लक्ष्य

इस्रायलने दक्षिण गाझा येथील नासेर रुग्णालयावरही (Hospital) छापेमारी केली होती. नासेर रुग्णालयाचे संचालक नाहेद अबू तैमा म्हणाले की, अबू सेलमिया सोमवारी गाझामधून सुटका करण्यात आलेल्या 55 पॅलेस्टिनी कैद्यांपैकी एक आहे. नाहेद अबू तैमाने सांगितले की, 55 ओलिसांपैकी फक्त पाच जणांना नासेर रुग्णालयात नेण्यात आले, बाकीच्यांना देर अल-बालाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात नेण्यात आले.

Israel Hamas War: 'दररोज मानसिक आणि शारीरिक छळ होत होता…'; इस्रायलने गाझामधून 55 कैद्यांची केली सुटका!
Israel Hamas War: ‘’इस्रायली सैन्याने आगेकूच केल्यास ओलिसांना गोळ्या घाला’’; हमासने दिला अल्टिमेटम

दररोज शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला

सुटकेनंतर अल-शिफा रुग्णालयाचे संचालक अबू सेलमिया यांनी इस्रायली अधिकाऱ्यांवर पॅलेस्टिनी ओलिसांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ओलिसांना दररोज शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. मात्र, अबू सेलमियाने केलेले आरोप इस्रायली अधिकाऱ्यांनी थेट फेटाळून लावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com