Israel Hamas War: हमास विरुद्ध लढणारा वेब सिरीज FAUDA चा क्रू मेंबर मतन मीरचा गाझामध्ये मृत्यू

Israel Hamas War: 'फौदा' ही इस्रायली वेब सिरीज आहे. जी इस्रायल संरक्षण दलाचे माजी सैनिक लिओर रझ आणि अवी इश्कारोफ यांनी तयार केली आहे. ही मालिका नेटफ्लिक्सने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केली होती.
Web series FAUDA crew member Matan Meir, who fought against Hamas, dies in Gaza.
Web series FAUDA crew member Matan Meir, who fought against Hamas, dies in Gaza.Dainik Gomantak
Published on
Updated on

Web series FAUDA crew member Matan Meir, who fought against Hamas, dies in Gaza:

इस्रायली नेटफ्लिक्स शो 'फौदा'च्या प्रोडक्शन क्रूच्या सदस्याचा गाझामध्ये हमासशी लढताना मृत्यू झाला आहे.

फौदा मालिकेच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शनिवारी ही माहिती देण्यात आली. 'टीम फौदा'ने त्यात लिहिले आहे, "आमच्या फौदा कुटुंबातील एक सदस्य मतन मीर गाझामधील युद्धात लढताना मरण पावला, हे जाहीर करताना आम्हाला दुःख होत आहे."

मतन हा फौजा सिरीजमधील महत्त्वाचा सदस्य होता. टीम फौदाने X वर लिहिले, "फौदाचे सर्व अभिनेते आणि क्रू मेंबर्स मतनच्या मृत्युमुळे खूप दु:खी आहेत. आम्ही मतनच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."

शुक्रवारी उत्तर गाझामध्ये हमासविरुद्ध लढताना मरण पावलेल्या पाच इस्रायली सैनिकांपैकी मतन मीर एक होता.

Web series FAUDA crew member Matan Meir, who fought against Hamas, dies in Gaza.
Israel-Hamas War: इस्रायली सैन्याने रुग्णालयांना केले लक्ष्य; दर 10 मिनिटाला नवजात बालकाचा होतोय मृत्यू

'फौदा' एक इस्रायली वेब सिरीज आहे, जी इस्रायली संरक्षण दलाचे माजी सैनिक लिओर राज आणि अवी इश्कारोफ यांनी तयार केली आहे.

ही सिरीज नेटफ्लिक्सने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केली होती. हा इस्रायलमधील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो अरबी आणि हिब्रूमध्ये चित्रित करण्यात आला आहे. नंतर तो इंग्रजीमध्ये प्रदर्शीत करण्यात आला.

Web series FAUDA crew member Matan Meir, who fought against Hamas, dies in Gaza.
Pakistan: दिवाळीच्या मुहुर्तावर पाकिस्तानच्या तुरुंगातून 80 भारतीय मच्छिमारांची सुटका, तब्बल 3 वर्षांनंतर...

'फौदा' मध्ये पॅलेस्टाईन आणि गाझामध्ये इस्रायली संरक्षण दल आणि गुप्तचर संस्था त्यांच्या शत्रूंचा कसा सामना करतात हे दाखवण्यात आले आहे.

यापूर्वी, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये फौदा वेब सीरिजमध्ये डोरॉनची भूमिका साकारणारा दिग्दर्शक आणि अभिनेता लिओर राझ हमासच्या रॉकेट हल्ल्यातून इस्त्रायलींना वाचवताना दिसला होता.

लिओरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या एक्स हँडलवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तो एका भिंतीच्या मागे लपून लोकांना वाचवताना दिसत होता, तर पलीकडून आकाशात रॉकेट डागले जात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com