Israel-Hamas War: WHO ने अल-शिफा हॉस्पिटलला केले डेथ झोन घोषित; नेतान्याहू म्हणाले, ''हमासचे दहशतवादी आमच्यासाठी जिवंत प्रेतं''

Israel Hamas War Latest Update: इस्रायल-हमास युद्धाला दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
Israel Hamas War Latest Update
Israel Hamas War Latest Update@6ixbuzztv
Published on
Updated on

Israel Hamas War Latest Update: इस्रायल-हमास युद्धाला दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, यूएनसह जगातील अनेक देशांनी इस्रायलला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.

यातच आता, WHO ने गाझामधील अल-शिफा हॉस्पिटलला 'डेथ झोन' घोषित केले आहे. शनिवारी शेकडो रुग्णांनी रुग्णालय रिकामे केले. मात्र, अद्यापही 25 कर्मचारी, 291 रुग्ण आणि 32 नवजात बालके रुग्णालयात आहेत.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिका (America) लवकरच इस्रायल आणि हमास यांच्यात ओलिसांची सुटका करण्यासाठी करार करु शकतो. अहवालानुसार, कतारही यामध्ये प्रभावी भूमिका बजावत आहे. करारानुसार, ओलीसांच्या सुटकेच्या बदल्यात 5 दिवसांचा युद्धविराम होऊ शकतो. मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने वृत्तपत्रातील वृत्त फेटाळून लावले असून सध्या असा कोणताही करार झालेला नसल्याचे सांगितले.

Israel Hamas War Latest Update
Israel-Hamas War: भारताने दुसऱ्यांदा पाठवली गाझाला मानवतावादी मदत, भारतीय हवाई दलाचे विमान रवाना

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू शनिवारी एका मुलाखतीत म्हणाले की, ''गाझा आणि बाहेरील हमासचे सर्व लोक आमच्यासाठी जिवंत मृतदेह आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आमच्यावर सातत्याने दबाव निर्माण केला जात आहे.'' हमास (Hamas) प्रमुख इस्माइल हनीये याच्या वक्तव्याचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, 'हमासच्या दहशतवाद्यांनी हातात रायफल असो किंवा सूट घातलेला असो, आमच्यासाठी सर्व लोक समान आहेत.'

ओलिसांची सुटका करण्यासाठी रॅली काढली

संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ''केवळ भूदल दक्षिण गाझापर्यंत पोहोचेल. त्यांचे अनेक वरिष्ठ कमांडर आम्ही मारले आहेत. आपला जीव वाचवणे हे हमासचे उद्दिष्ट आहे. आम्ही लवकरच आमच्या ओलिसांची सुटका करु.''

इथे तेल अवीव ते इस्रायलमधील जेरुसलेमपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत 30 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी हमासच्या कैदेतून ओलीसांना लवकरात लवकर मुक्त करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

Israel Hamas War Latest Update
Israel-Hamas War: इस्रायली लष्कराने दिला एक तासाचा अल्टिमेटम, गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयात चेंगराचेंगरी

38 टन मानवतावादी मदत पाठवण्यात आली

याआधी, भारताने गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 38 टन मानवतावादी मदत पाठवली होती. मदत पॅकेजमध्ये आवश्यक साधनसामग्री होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, शेवटच्या शिपमेंटमध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश होता. त्यांनी पुढे माहिती दिली की, भारत या भागातील बाधित नागरिकांना अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची योजना आखत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, गाझामध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवायांमध्ये भारताने नेहमीच नागरिकांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com