Israel-Hamas War: भारताने दुसऱ्यांदा पाठवली गाझाला मानवतावादी मदत, भारतीय हवाई दलाचे विमान रवाना

IAF Second C17 Aircraft Carrying Emergency Aid For Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी तीव्र होत चालले आहे.
IAF Second C17 Aircraft Carrying Emergency Aid For Gaza
IAF Second C17 Aircraft Carrying Emergency Aid For GazaDainik Gomantak
Published on
Updated on

IAF Second C17 Aircraft Carrying Emergency Aid For Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी तीव्र होत चालले आहे. इस्रायल जगातील बड्या-बड्या देशांचा विरोध पत्करुन गाझावर हल्ले करत आहे.

यातच, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल तर ते गाझामध्ये अडकलेल्या लोकांचे, जे कोणतीही चूक न करता शिक्षा भोगत आहेत.

अशा कठीण काळात भारत गाझामधील लोकांना सातत्याने मदत पाठवत आहे. रविवारी पुन्हा एकदा भारताने गाझामधील लोकांसाठी मोठी मदत पाठवली आहे. आज, भारतीय वायुसेनेचे (IAF) दुसरे C17 विमान गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 32 टन मदत सामग्री घेऊन इजिप्तमधील अल-अरिशकडे रवाना झाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली.

परराष्ट्रमंत्र्यांनी माहिती दिली

आपल्या X हँडलवर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लिहिले की, ''आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत देत राहू. 32 टन मदत सामग्री घेऊन भारतीय हवाई दलाचे दुसरे विमान इजिप्तच्या एल-अरिशच्या दिशेने रवाना झाले. भारताने (India) पाठवलेल्या 32 टन मदत सामग्रीमध्ये औषधे, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता साहित्य, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.''

IAF Second C17 Aircraft Carrying Emergency Aid For Gaza
Israel-Hamas War: ''हमासला संपवू शकणार नाही इस्रायल, आम्ही त्याला...''; शेजारील देशाची संतप्त प्रतिक्रिया

38 टन मानवतावादी मदत पाठवण्यात आली

याआधी, भारताने गाझामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 38 टन मानवतावादी मदत पाठवली होती. मदत पॅकेजमध्ये आवश्यक साधनसामग्री होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, शेवटच्या शिपमेंटमध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश होता. त्यांनी पुढे माहिती दिली की, भारत या भागातील बाधित नागरिकांना (Citizens) अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची योजना आखत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, गाझामध्ये सुरु असलेल्या लष्करी कारवायांमध्ये भारताने नेहमीच नागरिकांचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com