Israel तुरुंगात महिला सुरक्षा रक्षकाला बनवले लैंगिक गुलाम: आपबिती ऐकून पंतप्रधानांचा संताप

इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी देशातील सर्वात सुरक्षित तुरुंगात माजी महिला सुरक्षा रक्षकावर झालेल्या बलात्काराच्या चौकशीचे आदेश दिले.
Israel Rape Cases
Israel Rape CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Rape Cases: इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी रविवारी देशातील सर्वात सुरक्षित तुरुंगात माजी महिला सुरक्षा रक्षकावर झालेल्या बलात्काराच्या चौकशीचे आदेश दिले. कारागृहात एका माजी महिला सुरक्षा रक्षकावर बलात्कारासोबतच तिला सेक्स स्लेव्ह बनण्यास भाग पाडले गेले, असा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका पॅलेस्टिनी कैद्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या माजी महिला सुरक्षा रक्षकांनी केला केला आहे. तिच्या वरिष्ठांनी तिला लैंगिक गुलाम बनण्यास भाग पाडल्याचा आरोपही या माजी महिला सुरक्षा रक्षकांनी केला आहे.

Israel Rape Cases
Indian Girl Online Marriage: मद्रास HC चा मोठा निर्णय, तामिळनाडूची मुलगी करणार अमेरिकन मुलाशी 'ऑनलाइन लग्न'

गिलबोआ तुरुंगातील महिला सुरक्षा कर्मचार्‍यांवर कैद्यांकडून बलात्कार झाल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून येत आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये सहा पॅलेस्टिनी कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतर तुरुंगाच्या सुरक्षा रचनेत बदल करण्यात आला होता. कारागृहातील नाल्यांतून बोगदा करून कैदी पळून गेले होते. या घटनेने जगभरातील माध्यमांमध्ये स्थान निर्माण केले होते.

पीडितेने आपला त्रास ऑनलाइन पोस्टद्वारे कथन केला

गेल्या आठवड्यात, गिलबोआच्या माजी महिला सुरक्षा कर्मचार्‍यांनी ऑनलाइन पोस्टद्वारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सांगितली. पोस्टमध्ये तिने सांगितले की, 'पॅलेस्टिनी कैद्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिच्या वरिष्ठांनी तिला पॅलेस्टिनी कैद्याची खाजगी लैंगिक गुलाम होण्यासाठी भाग पाडले होते. पण माझ्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार व्हावा, अशी माझी इच्छा नव्हती, असे महिलेने लिहिले आहे.'

या प्रकरणाबाबत इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळात सांगितले की, 'सेवेदरम्यान सैनिकावर/सुरक्षा रक्षकांवर बलात्कार करणे हे सहन केले जाऊ शकत नाही. या प्रकरणाचा संपुर्ण तपास व्हायला हवा. तसेच महिला सैनिकाला मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू.'

Israel Rape Cases
युक्रेनियन बिझनेस टायकूनच्या घरावर Russia ने डागले क्षेपणास्त्र, पत्नीसह झाला मृत्यू

दुसरीकडे इस्रायलचे गृहमंत्री ओमर बार्लेव्ह म्हणाले की, काही वर्षांपूर्वी गिलबोआ तुरुंगात जे घडले होते त्याने इस्रायली जनतेला मोठा धक्का बसला होता. उत्तर इस्रायलमधील गिलबोआ तुरुंगात अनेक पॅलेस्टिनी कैद्यांना इस्रायली लोकांवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली तुरूंगात ठेवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com