Oleksiy Vadatursky Death: जगभरातील सर्व विश्लेषकांचे अंदाज धुडकावून लावत रशिया युक्रेनला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यावर बेतला आहे. युद्ध अद्याप अंतिम निकालापर्यंत पोहोचलेले नाही. यातच रशियाने युक्रेनमधील बड्या उद्योगपतींपैकी एक ओलेक्सी वडाटुर्स्की यांच्या घरावर हल्ला केला, ज्यामध्ये वडाटुर्स्की आणि त्यांची पत्नी ठार झाले.
वास्तविक, ही घटना युक्रेनच्या (Ukraine) दक्षिणेकडील मायकोलायव शहरातील आहे. सीएनएनने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, रशियाच्या (Russia) क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनियन उद्योगपती आणि त्यांची पत्नी ठार झाले. रशियाने त्यांच्या घरावर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामध्ये हे क्षेपणास्त्र थेट त्यांच्या बेडरुमवर आदळले. याच हल्ल्यात ओलेक्सी आणि त्यांची पत्नी रायसा यांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर या हल्ल्यात ओलेक्सी यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी ओलेक्सी यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की, 'क्षेपणास्त्र थेट ओलेक्सी यांच्या बेडरुममध्ये पडले.
ते पुढे म्हणाले की, 'रशियन युद्धनौकेने थेट लक्ष्यावर हल्ला केला यात शंका नाही. दुसरीकडे, युक्रेनच्या कृषी आणि जहाजबांधणी उद्योगांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ओलेक्सी यांनी अमूल्य योगदान दिले.'
दुसरीकडे, ओलेक्सी वडाटुर्स्की (Oleksiy Vadatursky) 74 वर्षांचे होते. ओलेक्सी युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे धान्य निर्यातदार असून निबुलॉनचे संस्थापक आणि मालक होते. ते सुमारे 34 अब्ज रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. विशेष म्हणजे, त्यांना 'हिरो ऑफ युक्रेन' चा पुरस्कारही देण्यात आला होता.
अहवालानुसार, हा हल्ला रशियाच्या उच्च अधिकार्यांनी पूर्वनियोजित केला होता. वडाटुर्स्की यांनी तिथे धान्य निर्यात करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.