Indian Girl Online Marriage
Indian Girl Online MarriageDainik Gomantak

Indian Girl Online Marriage: मद्रास HC चा मोठा निर्णय, तामिळनाडूची मुलगी करणार अमेरिकन मुलाशी 'ऑनलाइन लग्न'

India-America Online Marriage: तामिळनाडूच्या वासानी यांना मद्रास उच्च न्यायालयाकडून अमेरिकन नागरिक राहुल मधूसोबत ऑनलाइन लग्नाला मंजुरी मिळाली आहे.
Published on

भारतातील एका मुलीला अमेरिकेतील तरुणाशी ऑनलाइन लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील रहिवासी वसामी सुदर्शनी हिच्या ऑनलाइन (Online) लग्नाला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे दोघेही खूश आहेत. लग्न वुर्चअली होत आहे कारण राहुल एल मधु भारतात येऊ शकला नाही.

न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांनी तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाइन लग्नाबाबत वास्मी यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली होती. वास्मीने न्यायालयाला सांगितले की, तिला भारतीय (Indian) वंशाच्या राहुलसोबत लग्न करायचे असून तो सध्या अमेरिकेत (America) राहत आहे. त्याच्याकडे अमेरिकेचेच नागरिकत्व आहे.

Indian Girl Online Marriage
Pakistan सरकार झिरो, इम्रान खान हीरो; पूर्व मंत्र्यांने शरीफ सरकारवर साधला निशाणा

मला तीस दिवस का थांबावे लागले?

वसानी यांनी न्यायालयात सांगितले की, "आम्ही विवाह रजिस्ट्रारसमोर हजर झालो होतो. पण 30 दिवसांची अट असल्याने आम्हाला वाट पाहावी लागली. महिना उलटूनही आमच्या लग्नाच्या अर्जावर काहीही झाले नाही. राहुलची रजा नव्हती, त्यामुळे तो परत गेला. अमेरिकेला जाण्याआधी राहुलने लग्न नोंदणीशी संबंधित सर्व प्रक्रियेचे अधिकार देणार असल्याचे शपथपत्र दिले होते. त्यामुळेच त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न करण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com