Israel-Hamas War: इस्त्रायलचा मोठा निर्णय; गाझामधून परत बोलावले सैन्य; युद्धविरामासाठी ठेवली 'ही' अट

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. गाझामधील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा युद्धविराम लवकरच होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
Israeli Army
Israeli ArmyDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. गाझामधील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा युद्धविराम लवकरच होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे, इस्त्रायलवर युद्ध थांबण्यासाठी आतंरराष्ट्रीय दबावही वाढत चालला आहे. ईदपूर्वी पश्चिम आशियातील अर्थात अरब देशांमधील संबंध पुन्हा सामान्य होतील अशी शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. दरम्यान, इस्रायलने आता गाझामधून आपले सैन्य मागे घेतल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धाला सहा महिने उलटले असून रविवारी इस्रायलने दक्षिण गाझामधून अचानक सैन्य मागे घेतले. या निर्णयाची माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दिली. मात्र, सैन्य माघारीनंतर हमास रफाहवर हल्ला करु शकतो, असेही ते म्हणाले.

इस्रायलचे म्हणणे आहे की, आता दक्षिण गाझामध्ये फक्त एक इस्त्रायली ब्रिगेड उरली आहे. दरम्यान, चर्चेची नवी फेरी सुरु व्हावी यासाठी इस्रायल आणि हमास या दोघांनीही इजिप्तला शिष्टमंडळ पाठवल्यामुळे आशेचा किरणही निर्माण झाला आहे. त्यामुळे ईदच्या निमित्ताने पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये 1200 लोक मारले गेले. याशिवाय, सुमारे 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून इस्रायल गाझावर सातत्याने हल्ले करत आहे.

Israeli Army
Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा होणार युद्धविराम? ओलिसांच्या सुटकेसाठी...

दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याहू सरकारने सैन्य मागे घेतल्यानंतर आता खान युनिस शहरात पॅलेस्टिनी नागरिक परत येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत डिटेंशन कॅम्पमध्ये राहणारे लाखो लोक आपल्या घराकडे परतू लागले आहेत. मात्र शहर पूर्णपणे धुळीने माखले आहे. ठिकठिकाणी ढिगारा साचला असून अनेक ठिकाणी मृतदेह कुजल्याचा वासही येत आहे. खरे तर, खान युनिस शहर हे हमासचा गाझा प्रमुख याह्या सिनवार याचा बालेकिल्ला आहे. तो याच ठिकाणचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, याह्या सिनवार हा 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

Israeli Army
Israel-Hamas War: इस्रायलचा गाझामधील अल शिफा रुग्णालयावर हल्ला; 13 दिवसांत 400 जणांचा मृत्यू

तथापि, इस्रायलचे म्हणणे आहे की त्यांचे सैन्य अजूनही महत्त्वाच्या आघाड्यांवर तैनात आहे. दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतर इस्रायलने हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संपूर्ण युद्धात आपण एकटे आहोत हा संदेश बहुधा इस्त्रायलला द्यायचा नव्हता. हा निर्णय घेऊन नेतन्याहू यांनी मवाळ भूमिका घेतली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाबद्दल नेतन्याहू म्हणाले की, ''इस्रायल करारासाठी तयार आहे, परंतु आम्ही शरणागती पत्करणार नाही. या हल्ल्यात आमचे 1200 लोक मारले गेले आहेत. आम्ही त्यांना विसरु शकत नाही.'' तथापि, इजिप्तमध्ये जे घडत आहे त्याबद्दल ते म्हणाले की, हमासने ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली नागरिकांची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत युद्धविराम शक्य नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com